ETV Bharat / state

Sambhajinagar Crime: रिक्षाचलकाने केला अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, वडिलांनी दुचाकी आडवी लावल्याने फसला डाव

संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना वाळूज परिसरात घडली आहे. मात्र, मुलीला अचानक वडिल दिसल्याने तिने वडिलांना आवाज दिला. मुलीचा आवाज ऐकुन वडिलांनी दुचाकी रिक्षाला आडवी लावत रिक्षाचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

author img

By

Published : Apr 12, 2023, 7:33 PM IST

Updated : Apr 18, 2023, 10:34 PM IST

Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - रिक्षा चालकाने एकटी मुलगी पाहून गाडी पळवली, ती ओरडत होती मात्र, तो थांबत नव्हता. ऐन वेळी वडील दिसले मुलीने स्वतःची सुटका करून घेतल्याची क्कादायक घटना वाळूज परिसरात घडली. घटनेनंतर नागरिकांनी चालकाला मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली असून आता पर्यंत ही तिसरी घटना शहरात उघडकीस आली.

अशी घडली घटना : वाळूज औद्योगिक वसाहतीत 16 वर्षीय मुलगी एका कंपनी जवळून रिक्षात बसली. तिला एकटी बघून रिक्षा चालक 7 ते 8 किलोमीटर रिक्षा घेऊन गेला. तिला जायचे त्या ठिकाणी न जाता इतरत्र गाडी भरधाव घेऊन गेला. रिक्षाच्या दोन्ही बाजूंनी त्यांने दरवाजा बंद करुन घेतला होता. मात्र, मुलगी ओरडत होती. ती रिक्षावल्याला त्यांना गाडी थांबवण्याची विनंती करत होती, मात्र तो ऐकत नव्हता. मुलगी घाबरलेली असताना अचानक तिला तिचे वडील दिसले, अन् तिने त्यांना जोराचा आवाज दिला. वडिलांना आवाज ओळखीचा वाटला वाटल्याने त्यांनी गाडी रिक्षाला अडवली. तेव्हा आपलीच मुलगी अडचणीत असल्याचे त्यांना दिसून आले. वडिलांनी नागरिकांच्या मदतीने चालकाला हिसका दाखवला. वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल केला असून, एमआयडीसी पोलिसांकडून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे रिक्षाचालकांच्या गैर वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या आधीही घडली होती घटना : या आधी अशाच दोन घटना शहरात उघडकीस आल्या. मागील वर्षी घडलेल्या पहिल्या घटनेत मोंढा नाका परिसरात रिक्षात बसलेल्या मुलीला भरधाव गाडी चालवत रिक्षा चालकाने त्रास दिला होता. त्या मुलीने भर रिक्षातून खाली उडी मारली होती, त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर दुसऱ्या घटनेत शिकवणी वरून घरी जाताना रिक्षात बसलेल्या युवतीला रिक्षा चालकाने त्रास दिला होता. इतकच नाही तर, तिला ज्या ठिकाणी सोडायची तिथे न सोडता त्याने भरधाविका रिक्षा पळवली होती. रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लील संभाषण केले होते. त्यामुळे मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आली होती. या अशा घटनांमुळे रिक्षा चालकांच्या चारित्र्याबाबत प्रश्नचिन्ह उभ केले जात आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar On Jarandeshwar Case : जरंडेश्वर प्रकरणात क्लीन चिट नाही, चौकशी सुरू.. अजित पवारांकडून खुलासा

Last Updated : Apr 18, 2023, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.