ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या 'त्या' रिक्षा चालकाला अटक - सिडको पोलीस

17 वर्षीय युवती मोंढानाका येथून रिक्षात बसली. मात्र रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षा चालकाने अश्लील भाष्य केल्याने मुलीने गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षा चालकाने गाडीची स्पीड वाढवली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने चालत्या रिक्षातून उडी मारली. युवती गंभीर जखमी झाली.

सिडको पोलीस
सिडको पोलीस
author img

By

Published : Aug 29, 2021, 2:35 AM IST

औरंगाबाद - मोंढा नाका चौकात युवतीची छेडछाड काढणाऱ्या रिक्षाचालक आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आनंद अंबादास पहुलकर असे रिक्षाचालकाचे नाव असून सिडको पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

युवतीची रिक्षा चालकाने काढली होती छेड

शनिवारी सकाळी 17 वर्षीय युवती मोंढानाका येथून रिक्षात बसली. मात्र रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षा चालकाने अश्लील भाष्य केल्याने मुलीने गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षा चालकाने गाडीची स्पीड वाढवली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने चालत्या रिक्षातून उडी मारली. युवती गंभीर जखमी झाली. हेल्प रायडर ग्रुपचे सदस्य निलेश यांच्यासह नागरिकांनी युवतीला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सीसीटीव्हीच्या सहायाने घेतला आरोपीचा शोध

मोंढा नाका चौकातील उड्डाण पुलाच्या जवळ युवतीने रिक्षातून उडी घेतली. तिथे असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्हीत युवती उडी मारताना दिसून आली. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दिवसभर आरोपी रिक्षा चालकाचा शोध घेतला. अखेर सिडको पोलिसांनी आनंद अंबादास पहुलकर या रिक्षा चालकाला अटक केली. पुढील कारवाई सिडको पोलीस करत आहेत.

हेही वाचा - वसईत अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार; रेल्वे पोलिसांकडून तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.