ETV Bharat / state

पैठण विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - पैठण विधानसभा मतदारसंघ

आम्हीच गुलाल उधळणार अशी चर्चा शहरातील चौका-चौकात,  चावड्यांवर होत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अनेक ठिकाणी मतदान संपल्यानंतर मतदान यादी व टक्केवारीनुसार जोरदार आकडेमोड सुरू आहे. फटका नेमका कोणाला बसणार हे २४ ऑक्टोबर रोजी ईव्हीएमचे सील उघडल्यानंतरच कळेल.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Oct 23, 2019, 3:58 PM IST

पैठण - महाराष्ट्रच्या विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी मतदान पार पडले. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आमचाच उमेदवार निवडून येणार म्हणून देव पाण्यात ठेवून बसला आहे. तालुक्यात जिल्हापरिषदच्या ९ विभागांमधून कोणत्या विभागामध्ये कोणाला किती मतदान झाले आहे याची आकडेमोड कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचे नेते पदधिकारी आणि आकडेमोड करत आपलाच उमेदवार कसा निवडून येत आहे, याचे विश्लेषण करत आहेत. आम्हीच गुलाल उधळणार अशी चर्चा शहरातील चौका-चौकात, चावड्यांवर होत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच तालुक्यात मतदनाबाबत कोणाला किती मतदान होणार याचा अंदाज घेत प्रत्यक्ष मोबाईलवर संपर्क साधून ग्रामीण भागातील जवळच्या विश्वासू कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली जात आहे.

जिल्ह्यातील प्रमुख लढत म्हणून पैठण विधानसभेच्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्रातील जानकरांचे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान पैठण मतदारसंघात २००४ नंतर प्रथमच शिवसेनेचे आ. संदीपान भुमरे यांच्या विरोधात राष्ट्र्वादीचे दत्तात्रय गोरडे यांनी कडवे आव्हान उभे केले असून संघर्षपूर्ण लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचा हुकमी मतदार समजल्या जाणारा बंजारा समाज यावेळी वंचित बहुजन आघाडीसोबत गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी0चे विजय चव्हाण व एमआयएम पक्षाचे प्रल्हाद राठोड यांच्या उमेदवारीमुळे ओबीसी व दलित, मुस्लिम, बंजारा समाजाच्या मतांचे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार असल्याने मतविभाजनाचा सर्वात जास्त फटका विद्यामान आ. भुमरे यांना बसणार आसल्याचे चित्र आहे. तर एमआयएमचे प्रल्हाद राठोड हे मुस्लिम मते कितपत घेण्यात यशस्वी होतात हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. तर एमआयएम उमेदवार प्रल्हाद राठोड याच्या प्रचाराकरता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होऊनही जास्त प्रमाणात मुस्लिम मते खेचण्यात राठोड अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकगठ्ठा होणारे मुस्लिम मतदान यावेळी चार ठिकाणी विभागले गेल्याचे मुस्लिम कार्यकर्ते मान्य करत आहे.

हेही वाचा - औरंगाबाद : आढावा जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा

परिवर्तन अटळ आसल्याची घोषणा करणारे तसेच राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळविलेले दत्तात्रय गोरडे यांच्या रूपात तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे पदधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले असल्याचे चित्र आहे तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते संजय वाघचौरे यांना विश्वासात न घेतल्याने व ऐनवेळी तिकीट कापल्याने नाराज असून त्यांच्या अनेक समर्थकानी शिवसेनेत प्रवेश केला असून संजय वाघचौरे विधानसभेच्या निवडणुकीत गनिमी काव्याने काम केल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी राष्ट्र्वादीच्या उमेदवाराला मारक आसल्याचीदेखील चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीला बालानगर, आड़ूळ, विहामांडवा, आपेगाव, दावरवाडी परिसरातून मतधिक्य मिळणार आसल्याची तर विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना पैठण शहर, चितेगाव, बिडकिन, ढोरकीन, परिसरातून मताधिक्य मिळणार आसल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहेत. भुमरे यांना बालानगर आणि गंगाथडी भागात मोठा फटका बसणार आसल्याचेही बोलले जात आहे. अपक्ष उमेदवार डॉ. धोंडीराम पुजारी यांच्या उमेदवारीमुळे सुशिक्षित मतदार वर्ग त्यांच्या मागे घेल्याने आणि ग्रामीण भागात जवळपास १२-१३ कोटी स्वखर्चाने नदी-नाले खोलीकरण व जलयुक्त शिवार, पांणदमुक्त रस्ते शिवरस्ते केल्याने तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

हेही वाचा - पैठणमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली

वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण यांचे बिडकिन, चितेगाव व आडुळ सर्कलमध्ये वर्चस्व असल्याने मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हे २४ ऑक्टोबर रोजी ईव्हीएमचे सील उघडल्यानंतरच कळेल.
पैठण विधानसभेत परिवर्तन होणार का...की पुन्हा संदिपान भुमरे निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची गुलाल उधळण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Intro:निवडणूक निकालाची प्रतीक्षा...काउंट डाउन सुरु

कसे झाले विधानसभा 2019 चे निवडणूक

पैठण-महाराष्ट्रच्या विधानसभा निवडणूका सोमवारी संपन्न झाल्यात जो तो आमचाच उमेदवार निवडून येणार म्हणून देव पाण्यात घालून बसले आहे तालुक्यात जिल्हापरिषदचे नऊ गटात पाचोड, आडूळ,चितेगाव,बिडकिन,ढोरकीन,पिंपळवाडी,दावरवाडी आपेगाव,विहामांडवा मधुन कोणत्या सर्कलमध्ये कोणाला किती मतदान झाले आहे याची आकडेमोड कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित व एमआयएम पक्षाचे नेते पदधिकारी,कार्यकर्ते हे स्वतःच्या व प्रतिस्पर्धी उमेदवारास किती मतदान झाले याची आकडेमोड करीत आपलाच उमेदवार कसा निवडून येत आहे त्याचे विश्लेषण करीत आम्हीच गुलाल उधळणार अशी चर्चा शहरातील चौका-चौकात,पानटपरी व चाहाच्या चुस्की वर होत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे तसेच तालुक्यात मतदनाबाबत कोणाला किती मतदान होणार याचा अंदाज घेत प्रयत्क्ष मोबाइल वर संपर्क साधुन ग्रामीण भागातील जवळच्या विश्वासु कार्यकर्त्यांकडून माहिती घेत आहे अनेक ठिकाणी मतदान संपल्यानंतर मतदान यादी व टक्केवारी नुसार आकडेमोड जोरदार सुरू आहे Body:आमचाच उमेदवार कसा विजय प्राप्त करणार म्हणून लोकांना पटवून सांगताना सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिसत होते, शहर व ग्रामीण भागात क्षणा क्षणाला उत्कंठा वाढणाऱ्या निकालाची प्रत्यक्ष निकालाची आता मतदाराना व नागरिकांना उत्सकुता लागली आहे
संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख लढत म्हणून पैठण विधानसभेच्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्रातील जानकराचे विशेष लक्ष लागले आहे काय होणार..?याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे दरम्यान पैठण विधानसभेत २००४ नंतर प्रथमच शिवसेनेचे आ.संदीपान भुमरे यांच्या विरोधात राष्ट्र्वादीचे दत्तात्रय गोरडे यांनी कडवे आव्हान उभे केले असून संघर्षपूर्ण लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेचा पॉकेट वोट असलेला बंजारा समाज यावेळी वंचित सोबत गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे तसेच वंचित बहुजन आघाडी चे विजय चव्हाण व एमआयएम पक्षाचे प्रल्हाद राठोड यांच्या उमेदवारीमुळे ओबीसी व दलित,मुस्लिम,बंजारा समाजाच्या मतांचे मोठ्या प्रमाणात मत विभाजन होणार असल्याने मतविभाजनाचा सर्वात जास्त फटका विद्यामान आ.भुमरे यांना बसणार आसल्याचे चित्र आहे तर एमआयएमच्या प्रल्हाद राठोड हे मुस्लिम मते कितपत घेण्यात यशस्वी होतात हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे तर एमआयएम उमेदवार प्रल्हाद राठोड याच्या प्रचाराकरिता एमआयएम पक्षाचे सर्वसर्वा खा.बै.असदोद्दीन ओवैसी यांची सभा होऊन ही जास्त प्रमाणात मुस्लिम मते खेचन्यात राठोड अपयशी ठरल्याचे दिसत आहे त्यामुळे एकगठ्ठा होणारा मुस्लिम मतदान यावेळी चार ठिकाणी विभागले गेल्याचे मुस्लिम कार्यकर्ते मान्य करीत आहे.मात्र परिवर्तन अटळ आसल्याची घोषणा करणारे तसेच राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळविलेले दत्तात्रय गोरडे यांच्या रूपात तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महा आघाडीचे पदधिकारी व कार्यकर्तेनी एकदिलाने काम केले असल्याचे चित्र आहे तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी चे मातब्बर नेते संजय वाघचौरे यांना विश्वासात न घेतल्याने व ऐनवेळी तिकीट कापल्याने नाराज असून त्यांच्या अनेक समर्थकानी शिवसेनेत प्रवेश केला असून संजय वाघचौरे विधानसभेच्या निवडणुकीत गनिमी कावा प्रमाणे काम केल्याची चर्चा आहे त्यांची नाराजी राष्ट्र्वादीच्या उमेदवाराला मारक आसल्याचे चर्चा आहे मात्र राष्ट्रवादी पक्षाला बालानगर,आड़ूळ,विहामांडवा,
आपेगाव,दावरवाडी सर्कल मधुन मतधिक्य मिळणार आसल्याची तर विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना पैठण शहर, चितेगाव,बिडकिन,ढोरकीन,
पिंपळवाडी सर्कल मधुन मतधिक्य मिळणार आसल्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहे. तसेच भुमरे यांना बालानगर व गंगथडी भागात मोठा फटका बसणार आसल्याची बोलले जात आहे. तसेच अपक्ष उमेदवार डॉ.धोंडीराम पुजारी यांच्या उमेदवारीमुळे सुशिक्षित मतदार वर्ग त्यांच्या मागे घेल्याने तसेच ग्रामीण भागात जवळपास १२-१३ कोटी स्वखर्चाने खर्च करूण नदी-नाले खोलिकरण व जलयुक्त शिवार,पांणदमुक्त रस्ते शिवरस्ते केल्याने तालुक्यात त्यांना माननारा एक मोठा वर्ग असून ते कितपत मतदान घेण्यात यशस्वी होतात यावर पैठण विधानसभेचे समीकरण अवलबुन आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण यांचे बिडकिन,चितेगाव व आडुळ सर्कल मध्ये वर्चस्व असल्याने मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हे २४ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम मशीनचे सील उघडल्यानंतरच कळेलConclusion:पैठण विधानसभेत परिवर्तन होणार का...की पुन्हा संदिपान भुमरे निवडून येणार...? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, एवढे मात्र खरे की प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते गुलाल उधळणया ची उत्सुकता शेंगेला पोहोचली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.