औरंगाबाद : युवकाने लग्नाची मागणी घातली पण तिने नकार दिला आणि त्यातूनच त्याने पेटवून (Researcher sets himself on fire) घेत युवतीला देखील जाळण्याचा प्रयत्न (Attempt to burn girlfriend) केल्याचे जळीत प्रकरणात (Gajanan Munde burning case Aurangabad) समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुलीने याआधी मुलगा त्रास देत असल्याची दोनदा पोलीस तक्रार दिली होती. त्यात त्याला समज देण्यात आली होती. तर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुलावर गुन्हा दाखल (case registered against Gajanan Munde) करण्यात आला आहे. researcher set himself on fire, latest news from Aurangabad, Aurangabad Crime
आधीही देत होता त्रास - गजानन मुंडे हा विद्यापीठात संशोधन करत होता. तिच्यासोबत त्याची मैत्री झाली मैत्रीवरून नंतर प्रेम जडले. त्यांच्या मैत्रीत वाद झाले आणि दोघेही वेगळे झाले. गजानन त्यामुळे मानसिक ताणतणावांमध्ये जगत होता. तो तिला माझ्यासोबत लग्न कर असं म्हणू लागला. मात्र तिला लग्न करायचे नव्हते. अनेक वेळा समजावून सांगूनही गजानन मागे लागत असल्याने, अखेर तिने बेगमपुरा ऑक्टोबर महिन्यात पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावरून अदाखल पत्र गुन्हा दाखल करून 149 ची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर तो पिच्छा सोडत नसल्याने पूजाने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन 17 नोव्हेंबर रोजी दुसरी तक्रार दिली होती. तसा राग त्याच्या मनात होताच. सोमवारी गजानन ने टोकाचे पाऊल उचलले. पूजा आपल्या प्रोजेक्टचं काम करत असताना तो आला माझ्याशी लग्न का करत नाहीस? असं म्हणत स्वतःसह तिच्यावर पेट्रोल टाकून त्याने पेटवून घेतलं. त्यात गजननचा मृत्यू झाला. तर पूजावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर गुन्हा दाखल - गजानन आणि पूजा जळाल्यानंतर घाटी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर पूजाच्या नातेवाईकांनी बेगमपुरा पोलिसात गजानन विरोधात पोलीस तक्रार दिली. त्यानुसार गजानन हा पूजाला त्रास देत होता. त्याबाबत पोलिसात रीतसर तक्रार दिलेली आहे. इतकच नाही तर गजानन सोबत त्याचे आई-वडील देखील पूजाला लग्न करण्यासाठी धमकावत असल्याचं नमूद करण्यात आलं. त्यानुसार गजानन वर गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीत आई-वडिलांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
अशी होती गजाननच्या घराची परिस्थिती - जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस या छोट्या गावात गजानन गुंडे राहत होता. त्याने विद्यापीठात वस्तीगृहात राहून संशोधन म्हणजेच पीएचडी सुरू केली होती. गावातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वांना परिचित होता. घरची परिस्थिती जेमतेम असताना आई-वडिलांनी त्याला शिकायला औरंगाबादला पाठवले होते. सहा महिन्यापूर्वीच त्याला एक महागडी दुचाकी देखील घेऊन दिली होती. आपला मुलगा शिकल डॉक्टर होईल असं स्वप्न शेतकरी आई-वडिलांचं होतं. मात्र प्रेमाच्या आहारी गेला आणि त्यांना टोकाचे पाऊल उचललं, त्यात त्याचा मृत्यू झाला आणि आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाची राख रांगोळी झाली.
पूजा होती कुटुंबात हुशार - जखमी असलेली पूजा साळवे सिल्लोड तालुक्यातील रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबातून असलेली पूजा हिला सात बहिणी आहेत आणि त्यात ही सर्वात हुशार आहे. विद्यापीठात ती देखील संशोधन करीत होती. लवकरच तीच संशोधन पूर्ण होणार होतं. त्यानंतर चांगली नोकरी करायची असं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी सिल्लोड चे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगल्या नोकरी बाबत विनंती केली होती अशी माहिती नातेवाईकाने दिली.