औरंगाबाद - देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाच्या या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना खतं-बियाणे आणि कर्ज मिळेल याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला देखील दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सुरुवातीला कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांची आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जायची. मात्र, आता रुग्ण आढळला तर त्याला रुग्णालयात दाखल किंवा क्वारंटाइन केले जात आहे. सरकारने काजळी न घेतल्यानेच राज्यात स्थिती गंभीर असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. मुळात शेतकऱ्यांचे कर्ज वाटप असो किंवा खतं वाटप सरकारचे नियंत्रण असायला हवे. शेतकऱ्यांसाठी कुशल काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देणे, खत आणि बियाणे मिळणे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.