ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी शनिवारी मशाल मोर्चा; पंढरपूरहून मुंबईपर्यंत 20 दिवसांची पायी दिंडी - RAMESH KERE PATIL

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक आणि मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत. त्यानंतर पायी दिंडीने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेते जाणार आहेत.

मराठा क्रांतीठोक मोर्चा पत्रकारपरिषद
मराठा क्रांतीठोक मोर्चा पत्रकारपरिषद
author img

By

Published : Nov 4, 2020, 3:00 PM IST

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा शनिवारी पायी दिंडी काढणार आहे. 20 दिवसाची ही दिंडी पंढरपूर येथून निघून मुंबईत मंत्रालय पोहोचणार आहे. शिवाय, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबादेत समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरहून 20 दिवसांची पायी दिंडी

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक आणि मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी शनिवारी पाच वाजेपर्यंत मुंबईच्या मशाल मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. मराठा समाजाने इतके मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडणार असेल तर यापुढे, एकाही मंत्र्यांला बंगल्याबाहेर पडू देणार नाही, असा इशारा यावेळी समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

राज्यात भरती होऊ देणार नाही -

मराठा समाजातील तरुणांची शैक्षणिक आणि नोकर भरती यासंदर्भात राज्य सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही आणि सर्वोच्च न्यायालय स्थगिती उठविण्यासाठी हालचाल करत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आणि नोकर भरती प्रक्रिया होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस भरती करू अशी घोषणा केली असली तरी, मराठा समाजाला बाजूला ठेवून पोलीस भरती केल्यास राज्यभर विरोध करण्यात येईल तसेच पुढील होणाऱ्या घटनेस सरकार जबाबदार राहणार असल्याचे समन्वयक रमेश केरे पाटलांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी -

मराठा आरक्षण उपसमिती पदाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची देखील समितीवरून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.