ETV Bharat / state

जनतेत जाऊन मिसळा; राज ठाकरे यांची मेळाव्यात कार्यकर्त्यांना सूचना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

Raj Thackeray said Office bearer should go to the public and do their work
जनतेत जाऊन त्यांच्यात मिसळा; राज ठाकरे यांची मेळाव्यात सूचना
author img

By

Published : Feb 15, 2020, 3:07 PM IST

औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यानी आज औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांची कामे करावीत त्यांची मने जिंकावी, अशी सूचना त्यांनी केली.

जनतेत जाऊन त्यांच्यात मिसळा; राज ठाकरे यांची मेळाव्यात सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसापासून औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. आज शहरातील गुलमंडी भागात असलेल्या श्री महावीर सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद दौरा आटोपून मुंबईला जाण्याअगोदर या मेळाव्याला राज ठाकरे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी कार्यकर्ता पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळावे, जनतेची कामे करून त्यांची मने जिंकावीत असे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना पक्षात काही गद्दार आहेत ते माध्यमांना चुकीच्या बातम्या पुरवतात अशा गद्दारांना पक्षात ठेवायचे की नाही याचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.