ETV Bharat / state

Raj Thackeray Aurangabad Rally : महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये धडाडणार राज ठाकरेंची तोफ, सभेसाठी जय्यत तयारी - राज ठाकरे सभा नियम व अटी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Row ) पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

Raj Thackeray Live Update
Raj Thackeray Live Update
author img

By

Published : Apr 30, 2022, 8:50 PM IST

Updated : Apr 30, 2022, 9:13 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Row ) पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल - औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे मुंबईहून पुण्यात दाखल झाले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद ( Raj Thackeray Blessings from Priest pune ) घेतल्यानंतर ते पुणे शहरातून ( Raj Thackeray Aurangabad pune News ) औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत. वाटेत येताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. औरंगाबदमध्ये पोहोचल्यानंतर क्रांती चौक परिसरात कार्यकर्त्यांनी त्यांचे शहरात जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो गाड्यांचा ताफा होता.

सभेला अटी-शर्तीसह परवानगी - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली. पण या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर मनसेच्या प्रमुख नेत्यांची पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी अटी आणि शर्तींवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) राज ठाकरेंच्या या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी अटी-शर्तीसह -

1. सदर जाहीर सभा दिनांक 01/05/2022 रोजी 16.30 ते 21.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

2. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

3. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकोंगसाटो निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.

4. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.

5. अट क्र. 2.3.4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील, सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचांक यांचे कडे द्यावी.

7. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15000 इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15000 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकलो, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जवाबदार धरले जाईल.

8. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशोत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

9. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरुध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

10. सभेसाठी वापरण्यात येणाचा ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण ( नियंत्रण व नियमन) नियम 2000 नुसार परिशिष्ट नियम 3 (1), 4 (1) अन्वये आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. एक लाख फक्त इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

11. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

12. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालया कडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.

13. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुपासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

14. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही विघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

15. सदर कार्यक्रमा दरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

16. हा कार्यक्रम सुव्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा- 5/आदेश/आ. बाद/ 2022-2575 औरंगाबाद शहर दिनांक 22/04/2022 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून ही परवानगी देण्यात येत आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Hindu Jan Nayak : बाळासाहेबांसाराखी शाल पांघरून राज ठाकरे हिंदू जननायक होणार का?

Last Updated : Apr 30, 2022, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.