औरंगाबाद - शहरातील निराला बाजार परिसरातील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा गुन्हेशाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून १४ गर्दुल्यांना तंबाखूजन्य हुक्का पिताना अटक केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - औरंगाबाद पालिकेत भाजप नगरसेवकांकडून 'नागपूरला चला'च्या घोषणा
प्रथमेश दीपक मोरे (वय१९), अभिषेक अशोक पंडुरे (वय २१), हर्षद गिरीश परदेशी (वय २२), यश प्रवीण नागोरी (वय २२), ( सर्व रा.धनमंडीबाग, औरंगपुरा), विनायक महेश आधाट (वय १९ रा.नागेश्वरवाडी, सुंदरनगर), सचिन संजय चव्हाण (वय २५ रा.कुंभारवाडा, औरंगपुरा), संदीप सुरेश चंडालिया (वय २४ रा. वडगाव कोल्हाटी, एमआयडीसी वाळूज), विरेन दत्ता जाधव (वय २२ रा. जोगेश्वरी ग्रामपंचायत, वाळूज), दिनेश दीपक चव्हाण (वय २२ रा.बाबूनगर, मातामंदिरजवळ, पैठणगेट), आकाश जय सौदे (वय २४ रा. गवलीगुंडा, हैद्राबाद, कुंभारवाडा औरंगपुरा), राहील खान जलील खान (वय १८ रा. काला दरवाजा, किलेअर्क), हुमान खान हमीद खान पठाण (वय१८ रा. किलेअर्क), फरदिन खान फिरोज खान (वय १८ उस्मानपुरा, औरंगाबाद), यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा हुक्का पिताना आढळला तसेच परवाना धारक शेख समीर शेख सलीम (वय २४ रा. रंगीन दरवाजा,लेबर कॉलोनी) आणि व्यवस्थापक फराज अहेमद सिद्दीकी (वय २१ रा. टाइम्स कॉलोनी, कटकटगेट) अशा चौदा ग्राहकांसह एकूण सोळा आरोपी हे तंबाखू उत्पादने अधिनियमचे उल्लंघन करताना आढळून आले.
हेही वाचा - औरंगाबाद विद्यापीठात #CAA वरून एबीव्हीपी आणि आंबेडकरी संघटनेचे विद्यार्थी आमने-सामने
मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ निराला बाजार येथील हॉटेल आर्ट अँड एक्झिक्युटिव्हच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या फ्लो कॅफे अँड लंच या ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असून हुक्का मध्ये तंबाखू जन्य फ्लेव्हर, पदार्थाचं पुरवठा केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने गुरुवारी रात्री या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील कॅफेवर छापा मारला असता याठिकाणी टेबलवर तरुण हुक्का पीत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी झडती घेतली असता, बिल्डिंगच्या टेरेसवर या हुक्कामध्ये फ्लेव्हर आणि तंबाखूजन्य पदार्थ भरले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तेथून दोन हुक्के आणि कॅफे मधून चार असे सहा हुक्का पॉट, दोन किलो फ्लेवर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई साह्ययक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, साह्ययक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक जाधव, हवालदार पठाण, राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाने केली.