औरंगाबाद: राज्यात सध्या भोग्याचा वाद वाढत चालला आहे. मनसेने 3 मे पर्यंत भोंगे उतरवावे अन्यथा मंदीरावर भोंगे लाऊन हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे. यातच 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा ठेवण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सभेची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) ऐतिहासीक सभेचे रेकाॅर्ड मोडणार असल्याचे मनसेने म्हणले आहे. दरम्यान पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (CP Nikhil Gupta) यांनी नवे आदेश जारी केले असून निर्बंध आदेश लागु केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनसेच्या वतीने मात्र काहीही झाले तरी सभा होणारच असे जाहीर करण्यात आले आहे. ठाण्याला सभा झाली त्यावेळी देखील जमाव बंदीचे लागू लागू होते.मात्र परवानगी मिळाली. असे सांगत सभेसाठी मनसे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. आम्ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली नाही तरी सभा होईलच अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हणले आहे, सध्या राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने आगामी काळात मंदीर, मश्जीद समोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अत्यास विविध राजकीय पक्ष, संघटना यांचा विरोध असुन त्यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.शहरात कोणताही अनुचित प्रकार घडु नये आणि सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागु होणार नाही. असे आदेशात म्हणलेआहे.
हेही वाचा : Somaiya's New Tweet : सोमय्या म्हणतात तो एफआयआर माझा नाहीच