औरंगाबाद - कोरोनाचे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये विविध लक्षण दिसून येत आहेत. रक्तात गाठी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून शरीरात पस होत असल्याचेही समोर आले. औरंगाबादेत एका महिलेच्या शरीरात पस झाल्याची बाब एमआरआय चाचणीनंतर समोर आली. कोरोनानंतर असा आजार होणारा भारतातील पहिलाच रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर्मनीत अशा सहा केसेस
कोरोनाच्या आजारपणानंतर शरीरात अनेक बदल होत आहेत. त्यातील हा एक प्रकार आहे. जर्मनीत मार्च ते मे दरम्यान अशा सहा केसेस लिटरेचरमध्ये नोंद आहेत. यातील चार कोविडबाधित व दोन लक्षणे नसलेल्या होत्या. त्यांना मणक्यात पस झालेला होता. ही जगातील सातवी घटना आहे तर भारतातील पहिला घटना असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोना रुग्णाच्या शरीरात पस महिलेला झाला होता मणक्यांच्या आजारबालाजी नगर येथे राहणाऱ्या महिलेला काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांच्या शरीरात विविध ठिकाणी पस म्हणजेच झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यात डोक्यापासून माकडहाड, पोट, पार्श्वभाग, किडनीजवळ, हातावरही पस होता. अशा परिस्थितीत रुग्णाच्या जीविताला धोका असतो त्यामुळे डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत रुग्णाच्या जीविताला धोका अधिक असतो मात्र रुग्णाने प्रतिसाद दिल्याने शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, अशी माहिती डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. श्रीकांत दहिभाते यांनी दिली.
महिलेला कोरोना होऊनही कळाले नव्हतेशस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या महिलेला कोरोना झाल्यावर तिच्या शरारीत पस झाला. मात्र महिलेला किंवा कुटुंबात कोणालाच कोरोनाची लागण झाली नव्हती. कंबर दुखीमुळे केलेल्या तपासणीत शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या. त्यानुसार कोरोना होऊन गेल्याचे देखील समोर आले. कोरोनामुळेच शरीरात पस झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. या महिलेला जवळपास 21 दिवस उपचार घेतल्यावर घरी सोडण्यात आले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना खुनी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्रवास ऱ्हासाच्या दिशेने - शिवसेना