औरंगाबाद - तपासात असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या लाचखोर उपनिरीक्षकासह त्याच्या सहकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गजेंद्र इंगळे असे त्या लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्याकडे एका प्रकरणाचा तपास होता. त्यामध्ये मदत करून आरोपी न करण्यासाठी उपनिरीक्षक इंगळे यांनी 30 हजाराची मागणी केली होती व ते पैशे त्याचा सहकारी समीर नासिर पठाण याला स्वीकारण्यास सांगितले होते. पैसे स्वीकारताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक केल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांनी दिली.