ETV Bharat / state

मराठवाड्यात मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी; विद्युत पुरवठा खंडित - मान्सूनपूर्व पाऊस

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जोरदार वारे असल्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

rain in marathwada
मराठवाड्यात पावसाची हजेरी
author img

By

Published : Jun 1, 2020, 12:21 PM IST

औरंगाबाद-मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. रात्री झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री अचानक सुसाट वारे वाहू लागले. विजेचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली.

औरंगाबादसह परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास दोन तास पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे उष्ण असलेल्या वातावरणात बदल झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. रविवारी रात्री आणि सोमवारी मध्य रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नागरिकांची धावपळ झाली.

जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांमुळे घराचे पत्रे देखील उडून गेले. शिवाय झाडेही उन्मळून पडली. या पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. गेल्या काही दिवसांपासून 42 डिग्रीच्या वरअसलेले तापमान खाली आले असले तरी जमिनीची धूप बाहेर पडत असल्याने उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येत असल्याने पावसाच्या सरी पुन्हा कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जून महिना सुरु होत असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र शेतीच्या कामांची लगभग सुरू झालेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.