ETV Bharat / state

'अजितदादांनी योजना तपासावी, मात्र ती पूर्ण करावी'

तांत्रिकबाबी तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना थांबवली आहे. मात्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.

Prashant bamb comment on Ajit pawar
भाजप आमदार प्रशांत बंब
author img

By

Published : Jan 31, 2020, 4:24 PM IST

Updated : Jan 31, 2020, 6:39 PM IST

औरंगाबाद - तांत्रिकबाबी तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना थांबवली आहे. मात्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. वॉटर ग्रीड योजनेत काही त्रुटी असल्याने या योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.

मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसाठी सर्व लोकप्रतिनिधींची २ फेब्रुवारीला बैठक आयोजित केल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दिली. शेतकरी आत्महत्या आणि शेतीसाठी लागणारे पाणी याबाबत करावे लागणारे उपाय याबाबत मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यासाठी असलेल्या योजना थांबवू नये, अशी मागणी एकत्रीतरित्या मुख्यमंत्र्यांकडे करण्याबाबत चर्चा करायची आहे. जेणेकरून विविध मागण्यांचा एकत्रित रेटा लावून धरता येईल, अशी माहिती प्रशांत बंब यांनी दिली.

प्रशांत बंब यांच्याशी बातचीत

हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020: राष्ट्रपती अभिभाषण; 'सीएए' ने गांधीजींचे स्वप्न पूर्ण

हेही वाचा - 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'

अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी वॉटर ग्रीडची योजना तापसण्याबाबत विचार केला असेल, तर तो योग्य आहे. काही नुकसान नाही हे पाहिलं पाहिजे. मात्र, आम्ही ४ वर्षे अभ्यास करून ही योजना राबवण्याचा प्रयत्नात होतो. आम्हाला विश्वास आहे की, ही योजना त्यांना पटली नाही तर दुसरी कोणती योजना त्यांच्या डोक्यात असेल तर ती योजना ते मराठवाड्यासाठी देतील असेही बंब यावेळी म्हणाले.

Intro:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंत्रिकबाबी तपासण्यासाठी वॉटर ग्रीड योजना थांबवली असली तरी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल असं मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केलं.

Body:वॉटर ग्रीड योजनेत काही त्रुटी असल्याने योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. योजना सुरू झाल्यावर त्याला लागणार वीज बिल कोण भरणार, पाण्याचा दर काय असणार असे अनेक प्रश्न असल्याने या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने योजना पुनः तपासू आणि काही अडचण नसेल तर योजनेला मंजुरी देऊ अस विधान अजित पवार यांनी सांगितले भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Conclusion:मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक 2 फेब्रुवारीला आयोजित केल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दिली. विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि शेतीसाठी लागणार पाणी याबाबत करावे लागणारे उपाय याबाबत मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. मराठवाड्यासाठी असलेल्या योजना थांबवू नये अशी मागणी एकत्रीत रित्या मुख्यमंत्र्यांकडे करण्याबाबत चर्चा करायची आहे. जेणे करून विविध मागण्यांचा एकत्रित रेटा लावून धरता येईल अशी माहिती प्रशांत बंब यांनी दिली. अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी वॉटर ग्रीडची योजना तापसण्याबाबत विचार केला असेल तर तो योग्य आहे. काही नुकसान नाही हे पाहिलं पाहिजे. मात्र आम्ही चार वर्षे अभ्यासकरून ही योजना राबवण्याचा प्रयत्नात होतो. आम्हाला विश्वास आहे की ही योजना त्यांना नाही पटली तर दुसरी कोणती योजना त्यांच्या डोक्यात असेल आणि ते ती योजना मराठवाड्यासाठी देतील अस देखील प्रशांत बंब यांनी सांगितली. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
1 to 1
Last Updated : Jan 31, 2020, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.