औरंगाबाद - ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचितला पाठिंबा देण्याचं जाहीर केले आहे, त्यांच्याशी वाटाघाटी होतील अशा अनेक मुस्लिम संघटना आता वंचित सोबत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, ऑल इंडिया बोर्डाचा हा निर्णय नसल्याचे सांगत बोर्डाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बुनई हसनी यांनी पत्रकार परिषद घेऊन आंबेडकर यांचे विधान धुडकावून लावले आहे.
ऑल इंडिया बोर्डाची निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला पाठींबा देण्याची परंपरा नाही. 'वोट कटुवा पार्टी' किंवा विजयी न होणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देत नाही. वंचित बहुजन आघाडीला काही दिवस आगोदर पाठिंबा देणारे स्वघोषित महाराष्ट्र अध्यक्ष उस्मान रहेमान शेख व सचिव जावेद सौदागर यांचे १६ जूलैला पद कार्यकाल संपला असून त्यांचा उलेमा बोर्डाशी कोणताही संबंध नाही, असे देखील पत्रकार परिषदेत हसनी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार??
वंचित या एका पक्षाला पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला होता त्यास बोर्ड सहमत नाही. राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत समाजहीतासाठी काम करणारे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवारांचे सर्वेक्षण करण्यासाठी उलेमा बोर्डाने समिती बनवली आहे. ही समिती प्रत्येक विधानसभा मतदार संघात जाऊन सर्वेक्षण करुन बोर्डाच्या अध्यक्षांना अहवाल सादर केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असा खुलासा औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बुनई हसनी यांनी केला आहे.
हसनी म्हणाले, उलेमा बोर्ड राजकीय काम करणारी संघटना नसून सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. यामध्ये सदस्य म्हणून मौलानांच नसून डॉक्टर, इंजिनिअर तथा विविध क्षेत्रातील साडेसात हजार सदस्य महाराष्ट्रातील आहेत. या पत्रकार परिषदेनंतर प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते पाहण गरजेचे आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!