ETV Bharat / state

'वंचित-एमआयएम'चा जागा वाटपाचा तिढा कायम; हैदराबादेत आंबेडकर-ओवेसींची होणार बैठक - असदुद्दीन ओवेसी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचीत बहुजन आघाडीची हैद्राबादमध्ये बैठक होण्याची शक्यता.

वंचीतचा जागा वाटपाचा तिढा कायम; हैद्राबादेत ओवेसी आणि आंबेडकरांची होणार बैठक
author img

By

Published : Aug 21, 2019, 1:26 PM IST

औरंगाबाद - एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ओवेसींकडे पाठवला होता. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी आंबेडकरांना पत्र पाठवले आहे. २६ ऑगस्टला हैद्राबाद येथे दोनही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी राहाणार की तुटणार याचा निर्णय हैदराबादेत होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जात आहेत. एमआयएमने जागावाटपात ७६ जागा मिळाव्या अशी मागणी केली होती. मात्र, वंचितची कोर कमिटी याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला १४० जागांची ऑफर देऊ केली आहे. त्यात आता आमची कोंडी होणार अशी शक्यता निर्माण झाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असदुद्दीन ओवेसींकडे पाठवला होता.

याअनुषंगाने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र पाठवले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे नेते डॉक्टर गफार कादरी यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ओवेसी यांनी दिलेले पत्र सुपूर्द केले.

Intro:एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र पाठवले आहे. औरंगाबादचे एम आय एम चे नेते डॉक्टर गफार कादरी यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ओवेसी यांनी दिलेले पत्र सुपूर्त केल.

Body:वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 26 ऑगस्टला हैद्राबाद येथे दोनही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Conclusion:गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी च्या राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यामुळे पक्षाने जागावाटपात 76 जागा एमआयएमला मिळाव्या अशी मागणी केली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीची कोर कमिटी याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी कडून काँग्रेसला 140 जागांची ऑफर देऊ केली आहे. त्यात आता आमची कोंडी होणार अशी शक्यता निर्माण झाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव असदुद्दीन ओवेसीं यांच्याकडे पाठवला आहे. त्या अनुषंगाने ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिले असून या पत्रात नेमकं काय लिहिलंय याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता ही देण्यात आलेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 26 ऑगस्टला हैदराबादेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीनंतर विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल असे संकेत आता सूत्रांकडून देण्यात आलेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.