कन्नड(औरंगाबाद) - पोस्को अंतर्गत गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असणाऱ्याच्या बाजूने बोलण्यासाठी 20 हजारांची लाच घेणाऱ्या पिशोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. रणजीत गंगाधर कासले (वय ३६ वर्ष) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
सापळा रचून अटक
दरम्यान घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारावर पिशोर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने आरोपीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून, तपास अधिकाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणातील तपास अधिकारी रणजीत कासले याने आरोपीच्या बाजूने बोलण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची लाच देण्याची इच्छ नसल्याने, त्यांनी याची माहिती लाचलुचपत पथकास दिली. मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत पथकाने सापळा रचून पिशोर पोलीस ठाणे परिसरात जणजीत कासले याला लाच घेताना पकडले.