औरंगाबाद : 'पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया' अशा निनावी फोन कॉलने पोलिसांची धावपळ उडवली. जवळपास चार तास तपासणी केल्यावर असे काहीच नसल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा फोन एका विशिष्ठ ॲपद्वारे आपली ओळख लपवून करण्यात आला. विशेष म्हणजे फोन करणाऱ्याने न्यायालयात वकिली करणाऱ्या अॅड.दत्तात्रय जाधव यांना नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर मात्र त्यांना याबाबत माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
फोन आल्याने उडाली धावपळ: एका अज्ञात फोन कॉलने औरंगाबाद शहर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. फोन करणारी व्यक्ती हिंदीत संभाषण करत होती. त्यावेळी 'पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया' असे सांगितले. न्यायालय बंद होण्याची वेळ असल्याने न्यायाधीश, वकील, कामकाजासाठी आलेले नागरिक न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या फोन मुळे पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांची तपास मोहिम : पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक राज्यश्री आडे यादेखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखल झाल्या. न्यायालयात तपास कार्य सुरू करण्यात आले. पहिल्या मजल्यापासून तर खालपर्यंत सर्वत्र शोधाशोध घेण्यात आली. तीन ते चार तास तपास मोहीम केल्यावर त्यात काही तथ्य नसल्याचा निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ॲपवरून केला संपर्क : पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने एका विशिष्ट ॲप द्वारे हा फोन केला होता. फोन नंबर दिसणार नाही त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रमांक दिसेल अशी सुविधा असलेल्या हे ॲप होतं. फोनवर धमकी दिल्यावर आपला नंबर सांगितला. तपास सुरू असताना पोलिसांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असत न्यायालयात काम करणारे वकील दत्तात्रय जाधव यांचा असल्याचं समोर आल. पोलिसांनी त्या क्रमांकावर नंतर संपर्क केला जाधव त्यावेळेस आपल्या खाजगी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. त्यांना सर्व माहिती कळताच त्यांनी धक्का बसला. मात्र याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यावरून पुंडलिक नगर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवत पुढील कारवाई सुरू केली आहे.
अॅड.जाधव यांना आला होता फोन : औरंगाबाद खंडपीठात काम करणारे अॅड. दत्तात्रय जाधव यांना याआधी एक निनावी नवीन फोन आला होता. 26 जानेवारी त्यांना आज फोन आला असून त्यावेळी तुमच्या कार मध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगत खंडणीची मागणी केली होती. मात्र त्यावेळी ते राज्याबाहेर असल्याने त्यांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. त्यावेळेसही अशाच एका ॲपवरून त्यांना फोन करण्यात आला होता. त्यामुळे नंबर दिसून आला नाही याबाबत सायबर सेलने तपास सुरू केला आहे.