ETV Bharat / state

BRS Meeting: बीआरएस सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, सभा स्थळ बदलून होणार सभा - BRS Meeting at Chhatrapati Sambhajinagar

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखरराव यांची जाहीर सभा 24 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. अमखास मैदान येथे होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजित मैदान सभेसाठी योग्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे दुसऱ्या मैदानावर सभा घेण्याचे नियोजन पक्षातील कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे.

BRS meeting
के. चंद्रशेखरराव यांची जाहीर सभा
author img

By

Published : Apr 19, 2023, 1:08 PM IST

छत्रपती संभाजी नगर: नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सभेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव 24 एप्रीलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेवत बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी के चंद्रशेखर यांनी आता मराठवाडयावर लक्ष केंद्रीत केले आहे.

BRS meeting
के. चंद्रशेखरराव यांची जाहीर सभा 24 एप्रिल 2023 रोजी

सभेसाठी ही जागा योग्य नाही: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्राध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा शहरात घेतली जाणार, याची घोषणा गेल्या एक महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. याआधी 18 एप्रिल किंवा 24 एप्रिल अशा सर्वांच्या तारख्या नियोजित करण्यात आल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत पदाधिकाऱ्यांनी 24 एप्रिल ही तारीख निश्चित झाल्याचे सांगितले होते. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आमखास मैदान येथे ही सभा सायंकाळी होईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र नियोजन सुरू असतानाच पोलिसांनी मात्र सभेसाठी ही जागा योग्य नसल्याचे सांगत परवानगी नाकारली आहे. इतकच नाही तर सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे देखील ही सभा घेता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले. परवानगी नाकारत असताना मिलिंद कॉलेज जवळ ही सभा घ्यावी असा पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र त्याला चंद्रशेखर राव यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता सभेबाबत आणखीन एका मैदानाची व्यवस्था कार्यकर्ते करत आहेत.

सभा होणार जागा बदलली: पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, दुसऱ्या जागेवर सभा होईल अस पक्षांकडून सांगण्यात आले आहे. भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने या सभेत हजारो कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी जागा लागणार असल्याकारणाने सभेचे जागेचे स्थळजबिंदा मैदान बीड बायपास रोड होईल असे सांगण्यात आले. पूर्वी घोषित केलेले मैदानाची जागा अत्यंत कमी असल्याकारणाने व पार्किंगची सोय नसल्याकारणाने आम्ही जागेचे स्थळ बदललेले आहे, असे पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: BRS Public Meeting एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची लोहा येथे भव्य सभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.