ETV Bharat / state

Chitra Wagh At Vaijapur : पोलीस महिलांच्या संरक्षणासाठी की आमदाराला वाचवण्यासाठी..? चित्रा वाघांचा पोलिसांना सवाल - वैजापूर पोलीस औरंगाबाद

शिवसेना आमदार रमेश बोरनारे ( Shivsena MLA Ramesh Bornare ) यांच्यावर त्यांच्या भावजयीला मारहाण केल्याचा आरोप आहे. याचसंदर्भात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वैजापूर ( Chitra Wagh At Vaijapur ) पोलिसांत ( Vaijapur Police Aurangabad ) जात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. पोलीस महिलांच्या संरक्षणासाठी आहेत की आमदाराला वाचविण्यासाठी असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

पोलीस महिलांच्या संरक्षणासाठी की आमदाराला वाचवण्यासाठी..? चित्रा वाघांचा पोलिसांना सवाल

author img

By

Published : Feb 24, 2022, 3:56 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) : औरंगाबादच्या वैजापूर येथील आमदार रमेश बोरणारे ( Shivsena MLA Ramesh Bornare ) यांनी आपल्या चुलत भावजायीला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून, त्यांनी वैजापूर पोलिसांबाबत संशय निर्माण केला ( Chitra Wagh At Vaijapur ) आहे. पोलीस हे महिलांचे संरक्षण करणयासाठी आहेत की, आमदाराला वाचवण्यासाठी आहेत, असा जाब वैजापूर पोलिसांना ( Vaijapur Police Aurangabad ) विचारत चित्रा वाघ यांनी वैजापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त केला आहे.

पोलीस महिलांच्या संरक्षणासाठी की आमदाराला वाचवण्यासाठी..? चित्रा वाघांचा पोलिसांना सवाल

पोलिसांची मिलीभगत आहे का?

काल चित्रा वाघ यांनी औरंगाबादच्या वैजापुरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेवून नंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना बोरणारे प्रकरणात वैजापूर पोलिसांच्या तपासात मिलीभगत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सटाना येथील जयश्री बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने शिवसेनेचे आमदार बोरणारे व इतर आठ ते दहा लोकांनी मिळून भर रस्त्यावर खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतरही पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी त्या महिलेला पाच तास ठाण्यात धरून बसवून ठेवले. त्यानंतर ३५४ ब, ३२६ विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता केवळ जामीनपात्र गुन्ह्याची नोंद करून आमदाराला पाठीशी घातल्याचा आरोपही वाघ यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांना हाताशी धरून घटनेनंतर फिर्यादी महिलेवर अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.