ETV Bharat / state

दुकान फोडणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या, दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Pundalikanagar Police Thane

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांनी त्यांच्या एका साथीदारासोबत बीड बायपास रोड वर रविवारी रात्री नोबल फार्म मेडीकल फोडली. तसेच मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील गायत्री किराणा जनरल स्टोअर्स व देशी दारु दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. बीड बायपास रोड येथून एक होंडा शाईन दुचाकी चोरली होती.

दुकान फोडणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Aug 25, 2020, 8:13 PM IST

औरंगाबाद - चोवीस तासाच्या आत पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने दुकान फोडणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आकाश भिमराव शिंदे (वय 19, रा. गौतमनगर, ग.नं. 15), गजानन सुभाष मकळे (वय 20, रा. मुकुंदनगर रेल्वे गेट नं. 56 जवळ) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांनी त्यांच्या एका साथीदारासोबत बीड बायपास रोड वर रविवारी रात्री नोबल फार्म मेडीकल फोडली. तसेच मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील गायत्री किराणा जनरल स्टोअर्स व देशी दारु दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. बीड बायपास रोड येथून एक होंडा शाईन दुचाकी चोरली होती. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तर देत होते. त्यांनी खोलात चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी विविध ठिकाणी आणखी पाच दुचाकीवर डल्ला मारल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून दोन लाखांच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. आरोपी हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्यामुळे जामीनावर सुटताच गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी इतर ठिकाणीही त्यांनी चोऱ्या केल्या असल्याची दाट शक्यता आहे. न्यायालयात हजर करून त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

त्यांचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम पुंडलीक नगर पोलीस करत आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार रमेश सांगळे, दादाराव पवार, पोलीस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, रवि जाधव, दिपक जाधव, कल्याण निकम, जालिंदर मान्टे, विलास डोईफोडे व ठाणे पोलीस अधिकारी संतोष बोधक यांचा सहभाग होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.