औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या लोकांना उडवून देणाऱ्या कार चालकास सिल्लोड शहर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना उडवून देणाऱ्या कार चालकास सिल्लोड शहर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सिल्लोड न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. शेख जाहेद मोहमद अनिस असे आरोपीचे नाव आहे.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात 3 जण ठार, तर सहा जण जखमी झाले होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आर्थिक मदत -
सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील मोढा वाडीजवळ जीपने धडक दिल्याने या अपघातात गुलाम नबी गणी पठाण ( रा. मोढा खु. ), शेख हमीद शेख अमीन (रा. मोबिनपुरा, सिल्लोड) शेख नईम मजीद (रा. जामा मस्जित, सिल्लोड ) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवार (दि.13 ) रोजी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मृतांच्या घरी जावून सांत्वन भेट दिली. तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजार रुपये रोख आर्थिक मदत केली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून देखील आर्थिक मदत मिळवून देवू, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
यावेळी युवानेते अब्दुल समीर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे,नगरसेवक शेख सलीम हुसेन, जुम्मा पठाण आदिंची उपस्थिती होती.