ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील 'या' देवी मंदिरात होते नवकन्येचे पूजन, नवरात्रौत्सवात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश - navratrotsav at pingalai temple

शारदीय नवरात्रोत्सवात माता पिंगळाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भाविक पिंगळाई गडावर गर्दी करतात. या गडावर नवरात्रौत्सवानिमित्त देवीची स्थापना करून अखंड नंदादीप प्रज्वलित करून ९ दिवस आदिमायेची  मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश देत या मंदिरात मुलींना देवी मानून येथे नवकन्येचे पुजनही केले जाते.

पिंगळाई देवी
author img

By

Published : Oct 6, 2019, 12:19 PM IST

Updated : Oct 8, 2019, 9:06 AM IST

अमरावती - देशभरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहाने देवीची आराधना करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध प्राचीन देवी मंदिरांमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील गडावरही पिंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत.

पिंगळाई देवी मंदिरात होते नवकन्येचे पूजन

शारदीय नवरात्रोत्सवात विहिरीतून प्रगट होत भक्तांना दर्शन देणाऱ्या माता पिंगळाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भाविक पिंगळाई गडावर गर्दी करतात. या गडावर नवरात्रौत्सवानिमित्त देवीची स्थापना करून अखंड नंदादीप प्रज्वलित करून ९ दिवस आदिमायेची मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत या मंदिरात मुलींना देवी मानून येथे नवकन्येचे पुजनही केले जाते.

हेही वाचा - रुख्मिणीच्या माहेरघरातील कुलस्वामिनी अंबिकादेवीला ११५१ अखंड ज्योतीचा संकल्प

मोर्शी-अमरावती राज्य महामार्गावर अमरावतीपासून ३५ किमी. अंतरावर असलेले गोराळा हे गाव आहे. तेथून दीड किमी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर पिंगळाक्षी देवीचे मंदिर आहे. माहूरच्या रेणुका देवीचे प्रतिरूप असलेली ही देवी स्वयंभू मानली जाते. पिंगळाक्षी देवीचे मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. अंदाजे ५०० - ६०० वर्षांपूर्वी बांधलेले हे ऐतिहासिक मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा - बच्चू कडू यांनी रक्तदान करून दाखल केला उमेदवारी अर्ज

या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचा चेहरा फक्त जमिनीवर असून उर्वरित शरीर जमिनीत आहे. या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याची आख्यायिका आहे. देवीचा तेजस्वी चेहरा हा पूर्वाभिमुखी आहे. तेजस्वी डोळे, उंच कपाळावर मोठे कुमकुम तिलक आणि हिरवे वस्त्र परिधान केलेले देवीचे रूप बघून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड चक्र आहे. ऐतिहासिक मंदिराची रचना आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आख्यायिका असल्याने नवरात्रात येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

या मंदिरात दिवसातून तीन वेळा देवीची पूजा केली जाते. ही पूजा देवीच्या वेगवेगळ्या रूपात होत असल्याचे मानले जाते. सकाळची पूजा बाल्यावस्थेतील रुपाची, दुपारची पूजा तारुण्य अवस्थेतल्या रूपातील, तर सायंकाळची पूजा ही वृद्ध अवस्थेतल्या रूपातील असते. नवसाला पावणारी देवी म्हणून पिंगलाक्षी देवी प्रसिद्ध आहे. आईप्रमाणे संकट काळात ती आपल्या पाठीशी उभी राहते, अशी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा

Intro:अमरावती जिल्ह्यातील या देवी मंदिरात होते नऊ कन्येचे पूजन.

नवरात्री उत्सवात बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश

पिंगळाई गडावर नवरात्रीचा उत्साह
राज्यभरातील भाविकांची दर्शनाकरिता गर्दी
-----------------------------------------------
अमरावती अँकर
देशभरात सध्या नवरात्रोत्सव उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात देवीची आराधना करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध प्राचीन देवी मंदिरांमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील गडावरही पिंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत.पाहूया etv चा हा स्पेशल रिपोर्ट.

VO - शारदीय नवरात्रोत्सवात विहिरीतून प्रगट होत भक्तांना दर्शन देणाऱ्या माता पिंगळाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भाविक पिंगळाई गडावर गर्दी करत आहेत.पिंगळाई गडावर नवरात्राेत्सवानिमित्त देवीची स्थापना करून अखंड नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रोत्सव नऊ दिवस देवी मंदिरात साजरा केला जातो. सोबतच बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देत हा मंदिरात मुलींना देवी मानून येथे नवकन्येचे पुजनही केले जाते.

बाईट-1-पुजारी

मोर्शी-अमरावती राज्य महामार्गावर मोर्शीपासून २० किमी,. तर अमरावतीपासून ३५ किमी. अंतरावर असलेले गोराळा हे गाव तेथून दीड किमी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर पिंगळाक्षी देवीचे मंदिर आहे. माहूरच्या रेणुका देवीची प्रतिरूप असलेली ही देवी स्वयंभू मानली जाते. पिंगळाक्षी देवीचे मंदिर हे प्राचीन हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. अंदाजे ५०० ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेले हे ऐतिहासिक मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

बाईट-2-महिला भाविक

या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचा चेहरा फक्त जमिनीवर असून उर्वरित पूर्ण शरीर हे जमिनीत आहे. या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याची आख्यायिका आहे. देवीचा तेजस्वी चेहरा हा पूर्वाभिमुखी आहे. तेजस्वी डोळे, उंच कपाळावर मोठे कुमकुम तिलक आणि हिरवे वस्त्र परिधान केलेले देवीचे रूप बघून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड चक्र आहे.ऐतिहासिक मंदिराची रचना आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आख्यायिका असल्याने नवरात्रात येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

बाईट-3-महिला भाविक

फार वर्षांपूर्वी मंदिराच्या राजाचे पोट दुखायला लागले, तेव्हा पुजाऱ्याने देवीची आराधना करून अंगारा लावला. त्यानंतर राजाचे पोट दुखणे बंद झाले होते, अशी आख्यायिका आहे. त्यावेळी राजाने देवी मंदिरात सभामंडप बनवून दिल्याचा इतिहास सांगितला जात आहे.या मंदिरात दिवसातून तीन वेळा देवीची पूजा केली जाते. ही पूजा देवीच्या वेगवेगळ्या रूपात होत असल्याचे मानले जाते.

बाईट-3-महिला भाविक
बाईट-4

सकाळची पूजा बाल्यावस्थेतील रुपाची, दुपारची पूजा तारुण्य अवस्थेतल्या रूपातील, तर सायंकाळची पूजा ही वृद्ध अवस्थेतल्या रूपातील असते. नवसाला पावणारी देवी म्हणून पिंगलाक्षी देवी प्रसिद्ध आहे. आई प्रमाणे संकट काळात ती आपल्या पाठीशी उभी राहते, अशी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Oct 8, 2019, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.