पैठण (औरंगाबाद) - 'माझ्या मृत्यूचा कोणाला दोष देऊ नये, पप्पा मला माफ करा', अशी चिठ्ठी लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाचोड गावातील शिवाजीनगरात घडली. अंजली जाधव (वय-20) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.
अंजली होती डी.एड.ची विद्यार्थिनी -
अंजली ही पैठण शहरातील एका महाविद्यालयात डीएडचे शिक्षण घेत होती. गळफास घेतलेल्या अवस्थेत अंजली दिसून आल्यानंतर तिचे वडील काकासाहेब जाधव यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिवाजीनगरातील शिक्षक काकासाहेब सुरवसे, पोलीस अधिकाऱ्यांसह जमादार सुधाकर मोहिते घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. पंचनाम्यादरम्यान, एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली. त्यात अंजलीने 'माझ्या मरणासाठी कोणालाही दोष देऊ नका, पप्पा मला माफ करा', असे लिहिलेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शिक्षणात हुशार असलेल्या अंजलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले असावे, अशी चर्चा सुरू आहे. आत्महत्येचे ठोस कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पाचोड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा- CCTV Video कल्याण रेल्वे स्थानकात तरुणाची चाकूने वार करून हत्या