छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : वाळूज परिसरात एका अपघाताची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण हा अपघात म्हणजे लग्न एकिशी आणि संसार मात्र दुसऱ्या सोबत केल्या सारखे आहे. कारण अपघात केला एका वाहनाने आणि पोलीस स्टेशनमध्ये येताना मात्र दुसरच वाहन स्टेशनला आले. त्यामुळे नेमकं चाललं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय आहे प्रकरण? : छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध असलेली औद्योगिक वसाहत वाळूज परिसरात येणार एनआरबी कंपनी जवळ सकाळी दहा वाजता एक अपघात झाला. या अपघातात हायावा ट्रकने दुचाकी स्वाराला चिडले यात त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शनी दिलेला माहितीनुसार दुचाकीस्वार आपल्या कामानिमित्त जात असताना, समोर डुक्कर आल्याने त्याने आपल्या गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला. त्यातच मागून आलेल्या हायवा ट्रकने त्याला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत दुचाकी स्वाराचे प्रल्हाद बारसे (50) असं नाव असून तो कामानिमित्त बाहेर जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ट्रॅक बदलला? : घटनास्थळी असलेला हायवा ट्रक पोलीस स्टेशन पर्यंत जाताना मात्र मध्येच कसा बदलला अशी चर्चा रंगली आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्यावेळी काही लोकांनी काढलेल्या फोटोमध्ये असलेला हायवा ट्रक आणि प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात जमा झालेला ट्रक यात खूप मोठी तफावत आहे. याचे कारण म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळेस हायवा गाडीत वाळू भरलेली होती. त्यातून पाणी खाली पडत होते, गाडीवर नंबर देखील नव्हता अन् त्याची डिझेलची टाकी गोल होती. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी हायवा ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आला त्यावेळी त्याच्यावर नंबर होता, तोही अर्धवट खोडलेला दिसून आला. तर दुसरीकडे डिझेलची टाकी चौकोनी आणि मोठी होती. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीत वाळू देखील नव्हती. म्हणजेच रस्त्यातच हा ट्रक बदलण्यात आला, अशी चर्चा रंगली आहे. हा ट्रक बदलला कसा? वाळू माफियांवर पोलिसांचा वरदहस्त असल्याने हे शक्य झाले का. असे प्रश्न आणि चर्चा आता वाळूज परिसरात रंगली आहे. मात्र, ताब्यात असलेल्या हाईवा ट्रकनेच अपघात केल्याचा दावा पोलिस करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हेही वाचा : Sai Resort Scam : अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; साई रिसॉर्ट प्रकरणी बिझनेस पार्टनरला ईडीकडून अटक