अहमदनगर-पुणे महामार्गावर कारच्या धडकेत एक जण ठार - accident in aurangabad ahmednagar-pune road
अहमदनगर-पुणे महामार्गावर ढोरेगावजवळील भारत पेट्रोल पंपासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पुण्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाबासाहेब बोराडे हे जागीच ठार झाले आहे. बोराडे हे आपल्या गावावरुन पाहुण्यांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.

औरंगाबाद - अहमदनगर-पुणे महामार्गावर ढोरेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी अपघात झाला होता. सकाळी 11 वाजेच्या सुमारास पुण्याकडून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील बाबासाहेब बोराडे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पुणे महामार्गावर ढोरेगावजवळील भारत पेट्रोल पंपासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पुण्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाबासाहेब बोराडे हे जागीच ठार झाले आहे. बोराडे हे आपल्या गावावरुन पाहुण्यांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वराला पुढील उपचारासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. गंगापूर पोलिसांनी कार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.