गंगापूर (औरंगाबाद) - औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळा फाटा येथे सकाळच्या सुमारास कारने ट्रकला धडक दिल्याने कारमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल एकनाथ महाजन असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
असा घडला अपघात
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळा फाटा येथे जामनेर जळगाव येथून पुण्याकडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच 01 बीएफ 6297 व औरंगाबादवरून पुण्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच 16 एवाय 1107 ला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने कार चालक अनिल एकनाथ महाजन याचा जागीच मृत्यू झाला आहे. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करत मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शिवाय शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक औटे हे करत आहे.
हेही वाचा -दिलासादायक: रत्नागिरीतील तिन्ही बालकांची डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात