गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी महेश काशिनाथ काळे वय (२३ वर्ष, रा. जामगाव) याच्याकडून एक देशी कट्टा व जिवंत काडतूससह एकूण ४० हजार रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली आहे.
अशी झाली कारवाई
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी महेश काशिनाथ काळे (वय २३ वर्ष) हा युवक मालुज्यावरून गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौककडे येणार असून त्याच्याकडे एक देशी कट्टा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, पोलीस नाईक योगेश हरणे, चालक पोलीस शिपाई रिजवान शेख, यांच्यासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन सापळा रचत महेश काळे याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एकूण ४० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा-VIDEO : कैऱ्या तोडल्याने अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले