ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये टाळेबंदीच्या आधी बाजारपेठेत गर्दी

author img

By

Published : Mar 12, 2021, 8:20 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठताना दिसून येत आहे. मागील दोन दिवसातच दोन हजार रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शहराची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 1320 इतकी झाली आहे. वाढता उद्रेक पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - जिल्ह्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजार पेठा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला. त्यानुसार 13 मार्च रोजी शहरात बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याच पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती वाढली आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठताना दिसून येत आहे. मागील दोन दिवसातच दोन हजार रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शहराची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 1320 इतकी झाली आहे. वाढता उद्रेक पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आल्याने भीतीत भर पडली आहे असेच म्हणावे लागेल.

टाळेबंदी लागण्याची सर्वसामान्यांना भीती...

कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता जिल्ह्यात लॉक डाऊन लागण्याची चर्चा मागील सहा दिवसांपासून आहे. त्यात प्रशासनाने अंशतः लॉक डाऊन घोषित करत सकाळी सहा ते रात्री नऊ याकाळात बाजार पेठा उघडण्या असतील. त्यासोबत हॉटेल, मंगल कार्यालय असा गर्दीच्या ठिकाणांसाठी वेगवेगळी नियमावली तयार केली आहे. नागपूरला लॉक डाऊन सोमवार पासून लावण्यात येणार असल्याने शहरात देखील निर्णय होऊ शकतो या भीतीने नागरिक घरातील साहित्याचा साठा करण्यासाठी विशेषतः किराणा दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत आहेत. होणारी गर्दी पाहता पुढील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होईल याची भीती व्यक्त केली जात आहे.

तळीरामांनी केली गर्दी...

शनिवार-रविवार बाजारपेठा पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे, दारू दुकानातील बंदमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे तळीराम माने दारू दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळालं. पुढील काही दिवसांत स्टॉक भरून ठेवण्यासाठी तळीरामांनी शुक्रवारी दुपारपासूनच दारू दुकानासमोर गर्दी करायला सुरुवात केली. निश्चितच होणारी गर्दी ही चिंतेची बाब मानली जात आहे. यावर प्रशासनाने देखील लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

हेही वाचा - कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय; स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

हेही वाचा - लॉकडाऊनवरुन राजकारण तापले, लोकप्रतिनिधींना विचारात न घेता टाळेबंदीच्या निर्णयाचा भाजपकडून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.