औरंगाबाद - शहरानंतर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जिह्यात गुरुवारी सकाळी नवे 70 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 106 झाली आहे. जिल्ह्यात एकूण 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचारादरम्यान 166 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1231 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध ठिकाणी आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या
घाटी रुग्णालय परिसर (1), नॅशनल कॉलनी (1),सिंधी कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), पडेगाव (1), लक्ष्मी कॉलनी (2), हर्सुल, जटवाडा (1), म्हसोबा नगर, मयूर पार्क (1), खोकडपुरा (3), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (2), एन आठ सिडको (2), एन नऊ,सिडको (2), महू नगर (1), गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), एन बारा, हडको (1), कैसर कॉलनी (2), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (2),मिसारवाडी (1), नूतन कॉलनी (2), गांधी नगर (1), मुकुंदवाडी (1), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (1), नागेश्वरवाडी (1), श्रीराम नगर (1), रामेश्वर नगर (1), न्यू विशाल नगर (1), आझाद चौक (3), पुंडलिक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1), गणेश कॉलनी (2), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), औरंगपुरा (1), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1), रामदेव नगर (1), बजाज नगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 31 स्त्री व 39 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक 27 येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत एकूण 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 121 मृत्यू जिल्ह्यातील आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील 65 वर्षीय स्त्री आणि श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील 56 वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 44 व मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.