ETV Bharat / state

पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार - शरद पवार औरंगाबाद सभा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झंझावाती दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी पवार हे औरंगाबाद येथे होते. त्यांनी पुलवामा, युती, आघाडी, तसेच मनसे यावर आपले भाष्य केले.

शरद पवार
author img

By

Published : Sep 20, 2019, 9:22 PM IST

Updated : Sep 20, 2019, 10:51 PM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झंझावाती दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी पवार हे औरंगाबाद येथे होते. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील वातावरण बदलले. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या आगोदर पुलवामा हल्ला घडला आणि भाजप सरकारने त्याचा फायदा करून घेतला, यावेळी जर विधानसभा निवडणुकीआधी असा काही प्रकार घडला नाही तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यांनी पुलवामावर भाष्य केले आहे.

पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

हेही वाचा - नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्‍चारला नाही- अमोल कोल्हे

पवार म्हणाले, माझ्याकडे संरक्षण खात होतं. पुलवामा घटनेनंतर मी काही निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी त्यांनी शंका व्यक्त केली की, हा हल्ला जाणून बुजून केला होता की यामागे पाकिस्तानचा उद्योग होता याच्या खोलात जाण्याची गरज असल्याचे अधिकारी म्हणाले. अयोध्या राम मंदिरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशित सभेत जो चिमटा काढला, तो त्यांचा मित्र पक्ष शिवसेनेला तो एक इशाराच असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाच्या प्रक्रियेत मी नाही, मात्र, काही जागांची अदलाबदल बाबत चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - 'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची चौकशी झाल्यानंतर ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. तसेच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतही मनसे संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, पवार म्हणाले मनसेला सोबत घेण्याबाबत माझी इच्छा होती, मात्र काँग्रेसची इच्छा नसल्याने आम्ही या मुद्दयाबाबत ताणत बसलो नाही. वंचित आणि एमआयएम एकत्र येण हे भाजपला फायद्याचं असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - मनसे मुंबई विभाग अध्यक्षांची शुक्रवारी बैठक, विधानसभेबाबत निर्णयाची शक्यता?

नाशिक येथील मोदी यांच्या भाषणावर पवार म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात शेती आणि उद्योगातील मंदी यावर बोलतील असे वाटले होते मात्र, त्यांनी काहीही भाष्य केले नाही. तसेच मंदी कशी थांबणार आहे? काय उपाययोजना चालू आहेत. यावर एक शब्द काढला नाही. यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आता हे स्पष्ट झाले आहे." तसेच पवार म्हणाले, माझ्यावर मुख्यमंत्री बोलत होते ते कमी पडले म्हणुन त्यांनी पंतप्रधानांना बोलावले. मला वाटलं ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर बोलतील. मात्र, ते देखील माझ्यावर बोलले म्हणजे आमचं चांगलं चाललं आहे असं समजायला काही हरकत नाही.

Intro:Body:

[9/20, 7:28 PM] Amit Futane Aurangabad: पुलवामा हल्ल्यानंतर देशातील वातावरण बदललं. मी काही निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी हल्ल्याबाबत शंका व्यक्त केली. त्याची चौकशी झाली पाहिजे. विधानसभा निवडणुकीआधी आधी असा प्रकार घडू शकतो अशी शंका आहे - शरद पवार

[9/20, 7:29 PM] Amit Futane Aurangabad: अयोध्या राम मंदिर बाबत काढलेला चिमटा हा त्यांच्या मित्र पक्षाबाबत काढला होता.

[9/20, 7:31 PM] Amit Futane Aurangabad: काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपात मी नाही, काही जागांच्या अदलाबदल बाबत चर्चा सुरू आहे

[9/20, 7:32 PM] Amit Futane Aurangabad: मनसेला सोबत घेण्याबाबत माझी इच्छा होती, मात्र काँग्रेसची इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही काही ताणत बसलो नाही

[9/20, 7:34 PM] Amit Futane Aurangabad: पंतप्रधान आपल्या भाषणात शेती, उद्योगातील मंदी या प्रश्नावर बोलतील अस वाटलं, त्यांनी काय केलं आणि काय करणार हे सांगणे अपेक्षित होत मात्र तसे झालं नाही त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाही हे स्पष्ट झालं

[9/20, 7:41 PM] Amit Futane Aurangabad: वंचित आणि एमआयएम एकत्र येण हे भाजपला फायद्याचं - शरद पवार

[9/20, 7:48 PM] Amit Futane Aurangabad: माझ्यावर मुख्यमंत्री बोलत होते ते कमी पडले की काय त्यांनी पंतप्रधानाला घेऊन आले. मला वाटलं ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर बोलतील अस वाटलं मात्र ते देखील माझ्यावर बोलले म्हणजे आमचं चांगलं चाललं अस समजायला हरकत नाही - शरद पवार

Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.