औरंगाबाद - भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या हज हाऊसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मलिक आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. याबाबत मलिक यांना प्रश्न विचारला असता, सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेना सोबत जाण्याची इच्छा आहे, पण शिवसेनेचीही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का? हे शिवसेनेला विचारले पाहिजे. शिवसेनेने कमळाबाईला सोडलेलं आहे. त्यामुळे पुन्हा कमळाबाईला सोबत घ्यायचे का हे शिवसेना ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!
जितेंद्र आव्हाड इंदिरा गांधींविषयी काय बोलले मला माहीत नाही. ते काही बोलले असतील तर ते त्यावर खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी दिली.