ETV Bharat / state

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे औरंगाबादेत महास्वच्छता अभियान

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औरंगाबाद शहरात आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.

स्वच्छता करताना नागरिक
author img

By

Published : May 12, 2019, 12:13 PM IST

Updated : May 12, 2019, 1:07 PM IST

औरंगाबाद - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जवळपास २५ हजार लोकांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे स्वच्छता अभियान राबवले गेले. या अभियानात खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील सहभाग घेतला. शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात तसेच शहरातील रस्त्यांवर ही महास्वच्छता मोहिम राबवली गेली. या स्वच्छता अभिमानामध्ये २५ हजारपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले होते. शहरातील ३३ प्रमुख मार्ग तसेच अंतर्गत मार्गावर स्वच्छता करण्यात येणार आहे. एकूण १७० कि.मी. दुतर्फा रस्त्याची सफाई करण्यात आली.

स्वच्छता अभियानाविषयी माहिती देताना चंद्रकांत खैरे आणि इतर व्यक्ती

अभियानावेळी शासकीय कार्यालयाचा परिसर, उच्च न्यायालय परिसर, आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, आर.टी.ओ. आॅफिस, एस.एस.सी. बोर्ड, जिल्हा सत्र न्यायालय परिसर, पोलीस आयुक्तालय परिसर, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सर्व पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, महाविद्यालय, एस.टी. विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती बसस्थानक, बिबी का मकबरा, पानचक्की, पीरबाजार, गुरुद्वारा परिसर, घाटी रुग्णालय, यासह इतर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच क्रांतीचौक दफनभूमी, दर्गाह चौक कब्रस्तान, प्रतापनगर स्मशानभूमी, मुकुंदवाडी स्मशानभूमीसह एकूण १२ स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी ४०० वाहनांची व्यवस्था केली होती. कचरा संकलनात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष काळजी घेतली. स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या सदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने हातमोजे, मास्क, झाडू इत्यादी कचरा उचलण्याचे साहित्य देण्यात आले. यावेळी जमा केलेला कचरा सरकारी अथवा खाजगी वाहनातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याची सोय करण्यात आली होती.

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून कार्य करत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनीच अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून नियुक्त केले आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन धर्माधिकारी प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, दुर्घटना ग्रस्तांना मदत, स्मशानभूमी नुतनीकरण, धरण-तलाव-विहिरीतील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधणे, जलपुर्नभरण, खतनिर्मिती प्रकल्प, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे, पाणपोई, श्रवणयंत्र वाटप यासारख्या उपक्रमाचा यात सहभाग आहे. शहरातील नागरिकांनी, तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.

Intro:डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी औरंगाबादेत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून शहरात अभियानाला सुरुवात करण्यात आली असून जवळपास 25 हजार लोकांनी या अभियानात सहभाग घेतला. Body:सदर स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविले गेले. या अभियानात जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील सहभाग घेतला.Conclusion:औरंगाबाद शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात तसेच शहरातील रस्त्यांवर ही महास्वच्छता मोहिम राबविली गेली. या स्वच्छता अभिमानामध्ये 25 हजारपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील 33 प्रमुख मार्ग तसेच अंतर्गत मार्गावर स्वच्छता करण्यात येणार आहे. एकूण 170 कि.मी. दुतर्फा रस्त्याची सफाई करण्यात आली.
तसेच या मार्गावरील शासकीय कार्यालयाचा परिसर, उच्च न्यायालय परिसर, आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, आर.टी.ओ. आॅफिस, एस.एस.सी. बोर्ड, जिल्हा सत्र न्यायालय परिसर, पोलिस आयुक्तालय परिसर, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सर्व पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, महाविद्यालय, एस.टी. विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती बसस्थानक, बिबी का मकबरा, पानचक्की, पीरबाजार, गुरुद्वारा परिसर, घाटी रुग्णालय, यासह इतर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच क्रांतीचौक दफनभूमी, दर्गाह चौक कब्रस्तान, प्रतापनगर स्मशानभूमी, मुकूंदवाडी स्मशानभूमीसह अशा एकूण 12 स्मशानभूमी व दफनभूमीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी 400 वाहनांची व्यवस्था केली असून कचरा संकलनात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष काळजी घेतली.
स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या सदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने हातमोजे, मास्क, झाडू इत्यादी कचरा उचलण्याचे साहित्य देण्यात येणार आहे. जमा केलेला कचरा सरकारी अथवा खाजगी वाहनातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचविण्याची सोय करण्यात आली होती.
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून कार्य करीत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनीच अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून नियुक्त केले आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, दुर्घटना ग्रस्तांना मदत, स्मशानभूमी नुतनीकरण, धरण-तलाव-विहिरीतील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधणे, जलपुर्नभरण, खतनिर्मिती प्रकल्प, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे, पाणपोई, श्रवणयंत्र वाटप आदी उपक्रम डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबवीले जातात. औरंगाबाद शहरातील नागरिकांनी, तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या महास्वच्छता अभियानात सामील व्हावे, असे आवाहन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते.
Byte - चंद्रकांत खैरे - खासदार
Byte - अभियान सदस्य
Last Updated : May 12, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.