ETV Bharat / state

Muslim Reservation : मुस्लिम आरक्षण दिल्यास आगामी मनपा-नगरपालिका निवडणूक लढणार नाही - खासदार इम्तियाज जलील - Imtiaz Jaleel on Muslim Reservation Bill

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई असा तिरंगा मोर्चा काढला. मात्र, हा मोर्चा राजकिय फायद्यासाठी काढला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता राज्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी आरक्षण मुद्दा घेतल्याची टीका काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांनी केली आहे. येणाऱ्या अधिवेशनात जर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले तर राज्यात आगामी होणाऱ्या नगरपालिका आणि मनपा निवडणूक एमआयएम पक्ष लढणार नाही, अशी घोषणा एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

MP Imtiaz Jaleel
खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Dec 13, 2021, 4:46 PM IST

Updated : Dec 13, 2021, 6:52 PM IST

औरंगाबाद - येणाऱ्या अधिवेशनात जर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक ( Muslim Reservation Bill ) आणले तर राज्यात आगामी होणाऱ्या नगरपालिका आणि मनपा निवडणूक एमआयएम पक्ष ( AIMIM Party ) लढणार नाही, अशी घोषणा एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. ( AIMIM MP Imtiaz Jaleel ) जर या अधिवेशनात मुस्लिमाना आरक्षण मिळाले नाही तर राज्यभरातून पुन्हा भव्य मोर्चा आणि आंदोलन पुन्हा चालवले जातील, असा इशारादेखील त्यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार इम्तियाज जलील

आरक्षण मोर्चाबाबत होत आहे टीका -

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई असा तिरंगा मोर्चा ( AIMIM Tiranga Rally ) काढला. मात्र, हा मोर्चा राजकिय फायद्यासाठी काढला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता राज्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी आरक्षण मुद्दा घेतल्याची टीका काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांनी केली आहे. त्यावरून एमआयएम पक्षाने भूमिका घेत या अधिवेशनात जर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले तर राज्यात एमआयएम नगरपालिका आणि मनपा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली. जर या अधिवेशनात मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही तर राज्यभरातून पुन्हा भव्य मोर्चा आणि आंदोलन पुन्हा चालवले जातील, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

हेही वाचा - MIM Tiranga Rally : 'थ्री इन वन' सरकार मुस्लिम आरक्षण विसरले - असदुद्दीन ओवैसी

एमआयएम करणार 'लाव रे तो व्हिडिओ' -

मुस्लिम आरक्षणाबाबत याआधी इतर पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या मुस्लिम नेत्यांनी तर मुस्लिम समाजाचा खूप कळवळा दाखवला होता. मात्र, आता ते नेते गप्प असल्याने त्यांनी त्यावेळी केलेल्या वक्तव्यांची सीडी तयार केली आहे. ही सीडी सर्वत्र चौकाचौकात लावून त्यांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण करून देऊ, असे नको असेल तर आरक्षण द्या अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

Last Updated : Dec 13, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.