ETV Bharat / state

Marathi Name Plate Issue : मराठी पाट्यांवरून खासदार जलील यांची टीका, तर मनसेने केले जलील यांना लक्ष - मनसेने केली खासदार जलीलांवर टीका

मराठी पाटीच्या निर्णयानंतर आता राज्यातील राजकारण तापत चालल आहे. निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा काढला जातो, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

खासदार जलील आणि मनसे नेते खांबेकर
खासदार जलील आणि मनसे नेते खांबेकर
author img

By

Published : Jan 14, 2022, 4:37 PM IST

Updated : Jan 14, 2022, 4:51 PM IST

औरंगाबाद - राज्यातील सर्व दुकानांवर यापुढे मराठी भाषेतील पाट्या लावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र या निर्णयानंतर आता राज्यातील राजकारण तापत चालल आहे. नुसत्या पाट्या लावून रोजगार निर्माण होणार आहे का? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. तर जलील यांनी आत्तापर्यंत किती रोजगार निर्माण केले याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

नेत्यांचे आरोप प्रत्यारोप

मराठी पाट्यांबाबत खासदार जलील यांनी केली टीका

निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा काढला जातो, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. सध्या कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरी दोन वेळचे अन्न त्यांना मिळत नाही. अशा मराठी माणसाने या लोकांना सत्तेत पाठवला आहे. मराठी पाट्या लावून रोजगार निर्माण होणार आहेत का? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला. आता आगामी निवडणुकीत मराठीचा मुद्दा इतर पक्षांनी घेऊ नये किंवा त्या मुद्द्यावर पुन्हा कोणी आक्रमक होऊ नये, यामुळे शिवसेनेने त्या मुद्द्याला हात घालून मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिले आहेत. मराठी भाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे. मात्र त्या आडून हे राजकारण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देखील खासदार जलील यांनी केला आहे.

मनसेने विचारला जलील यांना प्रश्न

राज्यात मराठी पाट्या असाव्यात हे मनसेची आग्रही भूमिका आधीपासून राहिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय हे मनसेचे यश आहे, असे मत जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केले. खासदार जलील टीका करत असतील तर मागील काही वर्षात त्यांनी किती रोजगार निर्माण केले? किती लोकांना कामधंदे लावून दिले याचे उत्तर त्यांनी द्यावे. विनाकारण मराठी अस्मितेवर त्यांनी बोलू नये, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला.

हेही वाचा - BMC Mayor on Children Vaccination: आडमुठेपणा ठेवून जर लस घेत नसाल तर मग महामारी कायदा लावू - किशोरी पेडणेकर

Last Updated : Jan 14, 2022, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.