औरंगाबाद- शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा जिंकली. आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा ४४९२ मतांनी पराभव करत धक्कादायक विजय संपादित केला. या विजयानंतर मतदारांनी त्यांचे काम केले, आता मी माझे काम करणार असे आश्वासन नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादकरांना दिले आहे.
शहराच्या विकासासाठी नवनवीन योजना आणणार असून शहराला एक रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. पराभव झाल्यानंतर खासदार खैरे यांनी आता शहरात अनुचित प्रकार घडतील असे विधान केले. त्यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले मागील साडेचार वर्षात आमदार झाल्यापासून शहर शांत आहे. त्यामुळे समाजात गैरसमज पसरवून सामाजिक वातावरण खराब करू नका, असा सल्लाही त्यांनी खैरे यांना दिला. शिवसेनेने विकास केला नाही म्हणूनच आपण निवडणु आल्याचेही खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.