ETV Bharat / state

राजेश टोपे हे फक्त जालन्याचेच आरोग्य मंत्री आहेत का? खासदार जलील यांचा प्रश्न - mp Jalil Question Rajesh Tope on Ramdesivir

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जालना जिल्ह्यात घेऊन गेले. यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, राजेश टोपे हे फक्त जालन्याचेच आरोग्यमंत्री आहेत का? राजेश टोपे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा देखील विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

mp Jalil Question Rajesh Tope on Ramdesivir
रेमडेसिवीर राजेश टोपे प्रश्न जलील
author img

By

Published : Apr 19, 2021, 10:52 PM IST

औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जालना जिल्ह्यात घेऊन गेले. यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, राजेश टोपे हे फक्त जालन्याचेच आरोग्यमंत्री आहेत का? राजेश टोपे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा देखील विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

माहिती देताना खासदार इम्तियाज जलील

हेही वाचा - त्या मुलीला मृतावस्थेत सोडणारे निघाले तिचे बहीण भाऊजी

अमित देशमुख हे देखील फक्त लातूरचेच मंत्री आहेत का? असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला. सरकारमधील सर्वच मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्याचा विचार करून चालणार नाही, असेही जलील म्हणाले.

राज्यात परिस्थिती गंभीर झालेली असताना श्रेय घेण्याची ही वेळ नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती होती, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती द्यायला हवी होती. मात्र, रात्रीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन आणून श्रेय घेण्याची पद्धत चुकीची असल्याचे खासदार जलील म्हणाले.

भाजप नेत्यांनी निवडणुकी वेळी श्रेय घ्यावे

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, त्यामुळे आता श्रेय घेण्याचे काम करू नये. निवडणुकीच्या वेळी त्यांनी हवे तेवढा श्रेय घ्यावा, पण आता राजकारण करू नये, असे जलील म्हणाले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये मजुराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.