औरंगाबाद - शासकीय रुग्णालयातील रिक्त जागा भरा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी दाखल याचिकेत खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः पार्टी इन पर्सन म्हणून न्यायालयात आपली बाजू मांडली. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद खंडपीठात रिक्त जागांसाठी खासदार जलील स्वतः खटला लढला आहे.
अशी आहे याचिका
जलील यांनी स्वतः लढला रिक्त जागांसाठी खटला. अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील जागा रिक्त आहेत. कोविडमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आरोग्य विभागात काम करण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नसल्याची ओरड केली जात होती. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असताना त्या भरल्या जात नव्हत्या. याबाबत जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे रिक्त जागा भरण्याची मागणी केली होती. मात्र भरती प्रक्रिया राबविण्याबाबत उदासीनता दिसून आल्याने खासदार जलील यांनी न्यायालयात धाव घेत स्वतःच वकिलाच्या भूमिकेत बाजू मांडली.
शुक्रवारी होणार सुनावणीमागील महिन्यात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सुनावणीत खासदार जलील यांनी आपली बाजू मांडत, शासकीय रुग्णालयात रिक्त जगांमुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळवण्यात अडचणी येत असून उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याच सांगितलं. त्यावेळी एका महिन्याच्या आत भरती प्रक्रिया सुरू करावी असे आदेश खंडपीठाने दिले. त्यानुसार सोमवार दि. 15 जून रोजी खासदार जलील यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून खटला लढायला सुरुवात केली. मात्र राज्य सरकारने अवधी घेतल्याने दि 17 जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली. त्यावर न्यायालयाने 19 जून रोजी राज्य सरकारला आपल म्हणणं मांडण्यास सांगितले असून खासदार जलील यांना शपथपत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा-सरकारला हात जोडून विनंती..! पशूवैद्यकीय अधिकारी पदभरतीचे निकाल लावून जागा भरा