छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): 'केरळ स्टोरी' चित्रपट बनवणाऱ्यांना आधी हे सत्य आहे की काल्पनिक, याबाबत त्यांनी खुलासा करावा. पैसे कमवण्यासाठी किती खोटे बोलणार? खोटे बोलून संभ्रम निर्माण केले जात आहे. अशा गेलेल्या आधी 30 हजार महिला सांगितल्या. न्यायालयात गेल्यावर तीन हजार आकडा झाला. पैसे कमावण्याची आणखी साधने आहेत. 'इसिस'मधे जाणारे लोक अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम सारख्या देशातून मोठ्या प्रमाणात गेले आहेत. यांच्या अशा चित्रपटांमुळे 'इसिस'मध्ये लपून बसलेले गद्दार खुश होत असतील अशी टीकाही असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
हिटलरने देखील व्हिडिओ काढून तेढ वाढवला: जर्मनीमध्ये हिटलरने लोकांविरोधात अशाच पद्धतीने तिरस्कार निर्माण केला होता. वेगवेगळे प्रयत्न केल्यानंतर त्याने, व्हिडिओ तयार केले होते. त्यामुळे जर्मन लोकांमध्ये 'ज्यू' लोकांबाबत तिरस्कार निर्माण झाला. त्यांनी 'ज्यू' लोकांना मारले. अशाच काहीच्या गोष्टी आता पुन्हा घडल्या जात आहेत का? असा प्रश्न आहे. इतिहास आपली चूक सुधारण्यासाठी पाहिला जातो. मी हिटलरसोबत तुलना करत नाही किंवा मुघलांची गोष्ट पण सांगत नाही, असे देखील ओवैसी यांनी सांगितले.
पंतप्रधान काय करत आहेत? नॉर्थ ईस्टमध्ये जे होतय ते भाजपमुळे होत आहे. तुमच्या राजकारणामुळे तिथे 55 लोक मारले गेले. इकडे देशाचे पंतप्रधान सिनेमा प्रमोट करत आहेत, ते रोड-शो करत आहेत; मात्र आपली प्राथमिकता काय आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली. 'बीआरएस' पक्षाने सभा घेतली. प्रत्येक पक्षाला पुढे जाण्याचा अधिकार आहे. आम्ही देखील शहरात सभा घेऊ, तिथे खुर्च्या कमी आणि माणसे जास्त असतील, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
|