ETV Bharat / state

'त्या' मातेने पाहिली व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्या बाळाची पहिली झलक

रविवारी मध्यरात्री एका महिलेला प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या प्रसूती दरम्यान महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला पाहणे देखील आईला शक्य झाले नाही. आईची आणि बाळाची वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी वरिष्ठांची परवानगी घेत व्हिडिओ कॉलिंगवर मुलगी आणि आईची भेट घडवून आणली.

Baby
बाळ
author img

By

Published : May 6, 2020, 8:25 AM IST

औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात कोरोनाबाधित आईने नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलीची व्हिडिओ कॉलिंगद्वारे पहिली झलक बघितली. आपल्या बाळाला पाहून आईचे डोळे पाणावले होते. घाटी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आई आणि मुलीची ही अनोखी भेट घडवून आणली.

रविवारी मध्यरात्री एका महिलेला प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या प्रसूती दरम्यान महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला पाहणे देखील आईला शक्य झाले नाही. आईची आणि बाळाची वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्या दिवसापासून घाटातील डॉक्टर आणि परिचारिका बाळाची काळजी घेत आहेत. महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर नुकत्याच जन्मलेल्या बाळाचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र, बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला आपल्या कुशीत घेण्याची इच्छा प्रत्येक आईला असते. मात्र, कोरोना संसर्ग असल्याने या आईला आपल्या बाळाला जवळ घेणे शक्य नव्हते. आपल्या बाळाला एकदा बघावे असे त्या मातेला वाटत होते. तिची तळमळ घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना बघवली नाही. डॉक्टरांनी वरिष्ठांची परवानगी घेत व्हिडिओ कॉलिंगवर मुलगी आणि आईची भेट घडवून आणली.

या बाळाची संपूर्ण काळजी परिचारिका आणि डॉक्टर घेत आहेत. बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बाळाकडे जाता येईल. अधिष्ठाता डॉ. कनान येळीकर या स्वतः बाळाची शुश्रुषा समाधानकारक असल्याची खात्री करत आहेत. बाळाचे आजोबा आणि इतर नातेवाईकांचे टेलीकॉउंसलिंग (फोनद्वारे समुपदेशन) करण्यात येत आहे. या अगोदर जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेचा आपल्या मुलीशी अशाच प्रकारे संवाद घडवून आणला होता. त्याची पुनरावृत्ती घाटी रुग्णालयात पाहायला मिळाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.