औरंगाबाद- पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सर्वात जास्त औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी झाली असून त्याखालोखाल बीड तर सर्वात कमी नोंदणी हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्यात ३ लाख २० हजार ७७२ पदवीधरांनी नोंदणी केली आहे.
विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारांची मतदार नोंदणी ६ नोहेंबर रोजी पूर्ण झाली. मराठवाडयातील ८ ही जिल्ह्यातून ३ लाख २० हजार ७७२ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी औरंगाबाद जिल्ह्यातून झाली असून हिंगोली जिल्ह्यातून सर्वात कमी नोंदणी झाली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ६ नोहेंबरपर्यंत मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यात नव्याने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ९३ हजार ८२९ एवढी पदवीधरांची नोंदणी करण्यात आली आहे.
औरंगाबाद खालोखाल बीड जिल्ह्यात ५८ हजार ७२१ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. लातूर जिल्ह्यात ३३ हजार ९०६, नांदेड जिल्ह्यात ४० हजार ३२१, उस्मानाबाद जिल्ह्यात २८ हजार ५६०, परभणी जिल्ह्यात २७ हजार १२१, जालना जिल्ह्यात २१ हजार ६११, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी १४ हजार ७०६ जणांनी नोंदणी केली आहे.
हेही वाचा- औरंगाबादमध्ये रिक्षामध्ये बसलेल्या सहप्रवाशांना लुटणारी मावशी-भाचीची टोळी गजाआड