ETV Bharat / state

गारज येथील काचा फोडणारा माकड जेरबंद - पिसाळलेले माकड

गेल्या पंधरा दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने काचेच्या वस्तू फोडण्याचा उच्छाद मांडला होता. त्यात अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिसाळलेले माकड घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा, आरशे, चारचाकी वाहनाच्या काचा अशा वस्तू फोडत होता. माकड जेरबंद होताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गारज येथील काचा फोडणारा माकड जेरबंद
गारज येथील काचा फोडणारा माकड जेरबंद
author img

By

Published : Jun 24, 2021, 3:37 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील गारज गावात काचेच्या वस्तू फोडून उच्छाद मांडणाऱ्या माकडाला वन विभागाने जेरबंद केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये माकडापासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गारज येथील काचा फोडणारा माकड जेरबंद

गावकऱ्यांचे मोठे नुकसान -

गेल्या पंधरा दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने काचेच्या वस्तू फोडण्याचा उच्छाद मांडला होता. त्यात अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिसाळलेले माकड घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा, आरशे, चारचाकी वाहनाच्या काचा अशा वस्तू फोडत होता. आतापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान माकडाने केले आहे. तसेच लहान मुलांसह महिला नागरिकांना जखमी करून दहशतीचे वातावरण होते.

पिंजरा लावून केले जेरबंद -

पिसाळलेल्या वानराच्या भितीपोटी गावातील नागरिक भयभीत होते. घराचे दरवाजे बंद करून घरात बसण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. तसेच दुकानदार, वाहनधारक, लहान मुले आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अंभई येथील वनविभागाच्या वन्यजीव प्राणीमित्र समाधान गिरी, क्रिष्णा गिरी, संदीप गिरी यांनी गुरुवार (दि.२४) सकाळी अकराच्या सुमारास पिंजरा लावून माकडाला जेरबंद केले. माकड जेरबंद होताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.