औरंगाबाद - राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे, यावर 'मोदी है तो मुमकीन है' असा खोचक टोला खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. पेट्रोल दर वाढीचे नवे विक्रम होत आहेत. अशी टीका त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य त्रस्त -
मागील एक वर्षापासून कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसोबतच व्यापारी आणि छोटे कारखानदार यांचे व्यवसाय, रोजगार गेले आहेत. त्यात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने पुन्हा नवे निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक कोंडी झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करायला हवा, मात्र पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. असे मत एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
मोदी भक्तांना टोला -
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे खासदार जलील यांनी मोदी भक्तांवर टीका करत जे देशाच्या इतिहासात आतापर्यंत कोणी केले नाही ते आमच्या मोदीजींनी करून दाखवले. 'मोदी है तो मुमकीन है' अशी टीका खासदार जलील यांनी केली.
हेही वाचा - मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे छत्रपतींनी घेतली शरद पवारांची भेट