ETV Bharat / state

Jubilation In Aurangabad: औरंगाबादच्या नामांतरनंतर मनसे, ठाकरे गटाचा जल्लोष; शिंदे गटाने बदलल्या पाट्या

औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा होताच शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला. त्यानंतर शनिवारी सकाळ पासून वेगवेगळ्या संघटनांनी जल्लोष साजरा केला. त्यात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तर थोड्या वेळाने मनसेतर्फे आनंद व्यक्त करत लाडू वाटण्यात आले.

Jubilation In Aurangabad
शिंदे गटाचा जल्लोष
author img

By

Published : Feb 25, 2023, 5:22 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शहराच्या नामांतराची घोषणा शुक्रवारी रात्री केंद्राकडून झाल्यानंतर, शनिवारी सकाळपासूनच टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला. ठाकरे गटाकडून शहर प्रमुख असलेले बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तर त्यानंतर त्याच ठिकाणी मनसेने देखील जल्लोष केला. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फेटे घालून संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुतळास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत आणि मोतीचूरचे लाडू एकमेकांना भरवत आनंद साजरा केला. 35 वर्षांनी जनतेच्या मनात इच्छा पूर्ण झाली असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिंदे गटाने बदलली नावे: औरंगाबाद लिहिलेल्या जागी छत्रपती संभाजी नगर करण्याची मोहीम शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आली. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने शिवाजीनगर परिसरातील ज्या ज्या दुकान वर औरंगाबाद नाव लिहिले आहे त्या दुकान वरील पाट्या काढून छत्रपती संभाजीनगर असे पोस्टर चिटकवण्यास सुरुवात करण्यात आली. औरंगजेबाची आठवण असलेले औरंगाबाद नाव काढून आता छत्रपती संभाजीनगर नाव लावत असून या निर्णयाला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांना संभाजी महाराजांवरील पुस्तक भेट देणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

नामांतरणाला हिरवा कंदील: गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या नामकरणाबाबत केंद्राने हिरवा कंदील दिला. मात्र त्यातील शब्दांचा खेळ पाहता नाव बदल शहराचा केला की पूर्ण जिल्ह्याचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकानुसार शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्यात जिल्हा औरंगाबाद असे नमूद करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये दिलेले नाव औरंगाबाद तालुक्यापुरते मर्यादित आहे की, जिल्ह्याचे पूर्ण नाव बदलले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेना-भाजपकडून जल्लोष: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने दिल्यानंतर, जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. टीव्ही सेंटर भागात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री संदिपान भुमरे आणि भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. तर दुसरीकडे उद्धव गटाच्या नेत्यांनी मात्र बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या घोषणेनंतर जवळपास 35 वर्षांनी नामकरण प्रश्नावर केंद्राने पहिल्यांदा घोषणा केली. त्यावर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर या नावाची घोषणा: 9 मे 1988 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्ताव पाठवला होता. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केले. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो असे विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तर हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचचे आहे.

श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे: सर्वप्रथम बाळासाहेबांनीच संभाजीनगर नावाची भूमिका मांडली. त्यानंतर आम्ही 95 आणि 96 साली हा प्रस्ताव मान्य केला. मात्र न्यायालयात प्रकरण अडकले. लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराजांराचे नाव द्यावं हीच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. आम्ही श्रेयवादात पडणार नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांची मागणी अनेक वर्षानंतर मान्य झाली. यामुळे केंद्र सरकारचे आभार असे मत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्ते केले.

हेही वाचा: Villages Name Changing Demand: नामांतराचे पडसाद राज्यभरात उमटणार; 'या' मुस्लिमवाचक गावांची नावे बदलण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.