औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन कन्नड तालुक्यातील उपाययोजना संदर्भात आढावा घेतला आहे. त्यांनी तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे भेट देऊन सर्व कामाचा आढावा घेतला.
आमदार चव्हाण यांनी या भेटीदरम्यान तहसीलदार यांचाशी रेशनकार्ड धारकांना पूर्णपणे रेशन कसे मिळता येईल यांची उपाययोजना करुन या संकटात गोरगरीबांना धान्य उपलब्ध होईल, याबाबत चर्चा केली. ज्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी येत असेल त्याची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करावे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या जास्त प्रमाणात तक्रारी येत आहे, ह्या तक्रारींची दखल घ्यावी, असे सतीश चव्हाण यांनी सांगितले.
त्यांनी ग्रामीण रुग्णालयातही भेट दिली. यावेळी येथील कामे व्यवस्तिथपणे चालू आहे, परंतु तिथे खाटांची व्यवस्था कमी असल्याचे त्यांचा निदर्शनास आले. यावेळी, जिल्हाधिकारी यांचाशी भेटून ही कमतरता दूर केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नगरपरिषदेने पूर्व नियोजित चांगली तयारी केली आहे. त्यांनी वेळोवेळी फवारणी केली, स्वच्छतेविषयी चांगली काळजी घेतली आहे असल्याचे म्हणत चव्हाण यांनी कन्नड नगरपरिषदेचे अभिनदंन केले आहे.
तसेच मराठवाडा शिक्षण संस्थेच्या वतीने गरीबांना धान्याची कीट वाटप केली. यावेळी तहसीलदार संजय वारकड, सभागृह नेते संतोष किसनराव कोल्हे, नायब तहसीलदार शेख हारून, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देवगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव बनसोड, युवक तालुका अध्यक्ष कल्याण पवार, शहर अध्यक्ष अहेमद अली, माजी जिल्हा परिषद सदस्य शेकनाथ चव्हाण, आदिंची उपस्तिथि होती.