ETV Bharat / state

Sanjay Shirsat on Sanjay Raut : 'संजय राऊत रोज सकाळी बडबडतात, राज ठाकरे एकदाच पण लाखातला शब्द बोलतात' - आमदार संजय शिरसाट यांची टीका

एका ठाकरेला भेटले तर दुसऱ्याला का राग येतो. राज ठाकरे यांच्याकडे चांगली ध्येयधोरण आहेत आणि चांगल्या कल्पना जर त्यांच्याकडून मिळत असतील, तर भेटायला काय हरकत आहे. यांच्याकडे चांगल्या संकल्पना असतील तर उद्याच मुख्यमंत्र्यांना घेऊन तुम्हाला भेटतो, अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तर सुषमा अंधारेंबाबत कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मानगुटीवर बसावे आमच्या नाही, असेदेखील शिरसाट यांनी सांगितले.

MLA Sanjay Shirsat Criticise
आमदार संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका
author img

By

Published : Mar 27, 2023, 6:17 PM IST

Updated : Mar 27, 2023, 6:28 PM IST

आमदार संजय शिरसाट यांची टीका

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत, राज ठाकरे यांना ध्येयधोरण तरी आहे, तुमच्याकडे तेही नाही. राज ठाकरे काय पाकिस्तानामधून आलेत का? त्यांना अधिकार नाही का? तुमच्याकडे जर काही धोरण असतील तर सांगा मात्र ते तुमच्याकडे नाहीत. नुसते सकाळी सकाळी भू भू भुंकतो, मात्र हे एकदाच बोलतात पण लाखातला एक शब्द बोलतात, अशा भाषेत संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले.

सुषमा अंधारेंबाबत चुकीचे बोललो नाही : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी चुकीचे बोललो नाही. मात्र, त्या नेहमी विद्वान असल्यासारख्या बोलतात. हावभाव करतात, अभिनय करतात आणि टाळ्या मिळतात. मात्र, असे करताना त्यांना इतरांचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिला. शिवसेनेचा आणि तुमचा संबंध काय? तुम्ही आता आल्या आहात. मग आमच्या मानगुटीवर बसता कशाला, बसत असाल तर उद्धव ठाकरे यांच्या मानगुटावर बसा, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. सुषमा अंधारे यांनी कधी आमदारकी लढवली का? एकदाच लढवली होती तर त्यावेळेस 400 च्या जवळपास मते त्यांना मिळाली होती. परत त्या किती दिवस पक्षात राहतील याची शाश्वती त्यांना पक्षात घेणाऱ्यांनादेखील नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, असेदेखील शिरसाट यांनी सांगितले.

त्याच मुद्द्यांना घेऊन सभा : उद्धव ठाकरे साहेब यांची सभा म्हणजे टोमणे सभा असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच म्हणतात. तेच मुद्दे, त्याच टीका, तेच खोके ठरलेली वाक्य आहेत आणि त्याच्यावरच ते बोलतात. खरंतर अडीच वर्षांत त्यांनी काय काम केले ते सांगावे. आम्ही यादी घेऊन सर्व सांगत असतो, मात्र इकडे तेच मुद्दे सारखे घेऊन सारख्या सभा होत आहेत. मात्र, येणारा काळात लोक यांच्या सभेलादेखील येणार नाहीत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तुमच्याकडे काहीच नियोजन नाही, ते जर असते तर लोक तुमच्याकडे थांबले असते. लोकांची काम केली तर निवडणूक जिंकता येते, मात्र यांना असे वाटते की यांनी तिकीट दिले म्हणजे झाले, अशी खोचक टीका शिरसाट यांनी केली.

हेही वाचा : Rahul Gandhi Savarkar Row : सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानाचा ठाकरे गटाकडून निषेध; काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीला हजर राहणार नाही

Last Updated : Mar 27, 2023, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.