औरंगाबाद - मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी, मुख्यतः पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार प्रशांत बंब यांनी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या एकत्रित बैठकीचे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या विविध मागण्यांसाठी बैठक घेण्यासाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी आपल्या भागातील प्रलंबित मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत बंब यांनी केले.
हेही वाचा... अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी
गेल्या आठ वर्षांमध्ये गंगापूर मतदारसंघातील आमदार प्रशांत बंब यांनी पाच वेळा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली. मागील बैठकांमध्ये लोकप्रतिनिधींनी या बैठकीला अल्प प्रतिसाद दिला. मात्र उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आम्ही अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा दावा प्रशांत बंब यांनी केला आहे.
हेही वाचा... वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक
समन्यायी पाणी वाटपाचा महत्वाचा मुद्दा आपण याआधी मार्गी लावला आहे. बऱ्याच कामांची मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कमी प्रमाणात बैठकीला आले असले तरी, काम केले असल्याचे बंब यांनी म्हटले. तसेच आता पुढील बैठकीला लोकप्रतिनिधींनी यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 2 फेब्रुवारी रोजी रविवारी ही बैठक औरंगाबाद येथे घेण्यात येईल. या बैठकीला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यानुसार मुख्यमंत्र्यांना मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा केली जाईल, असे प्रशांत बंब यांनी सांगितले.