ETV Bharat / state

पाणी प्रश्नावरील बैठकीला आमदारांची पुन्हा दांडी

मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद इथल्या हॉटेल अजंता अँबेसिडरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. बैठकीला भाजपचे नऊ आमदार, तर संजय शिरसाठ शिवसेनेचे एकमेव आमदार उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रासारखी एकी मराठवाड्यातील आमदारांनी दाखवायला हवी होती, अशी खंत माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.

author img

By

Published : Feb 3, 2020, 11:03 AM IST

Updated : Feb 3, 2020, 12:47 PM IST

mla-meeting-on-water-issue-in-aurangabad
पाणी प्रश्नावर बैठकीला आमदारांची पुन्हा दांडी

औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील आमदार, खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या बैठकीत मराठवाड्यातील 55 आमदारांपैकी केवळ 10 आमदार उपस्थित होते. यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरले.

पाणी प्रश्नावरील बैठकीला आमदारांची पुन्हा दांडी

हेही वाचा- चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..

मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद इथल्या हॉटेल अजंता अँबेसिडरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. बैठकीला भाजपचे नऊ आमदार, तर संजय शिरसाठ शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. मात्र, काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळेच या बैठकीतील विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी आमदारांना धारेवर धरले.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे अनुपस्थित होते.

बैठकीला संयोजक भाजपचे आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर हे भाजपचे ९ आमदार तर शिवसेनेचे एकमेव संजय शिरसाठ असे एकूण १० आमदार बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर आहे. मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण भरत नाहीत. युती सरकारने मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून 'मराठवाडा वॉटरग्रीड'ची योजना जाहीर केली. मात्र, या योजनेला महाविकास आघाडी सरकारने योजना पुन्हा तपासावी लागणार असे जाहीर केले. त्यामुळे, यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार असून मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्न तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचे या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रासारखी एकी मराठवाड्यातील आमदारांनी दाखवायला हवी होती, अशी खंत माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.

Intro:मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर औरंगाबादेत मराठवाड्यातील आमदार ,खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या बैठकीत मराठवाड्यातील 55 आमदारांपैकी केवळ 10 आमदार उपस्थित होते. यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरले.Body:मराठवाड्याचा पाणीप्रश्न औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा आंबे सिटर मध्ये आमदारांची बैठक बोलवली होती बैठकीला नऊ आमदार बीजेपीचे तर संजय शिरसाठ शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. मात्र काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळेच या बैठकीत विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ग्रस्त महिला आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरलं.

Conclusion:मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे अनुपस्थित होते.
बैठकीला संयोजक भाजपचे आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर हे भाजपचे ९ आमदार तर शिवसेनेचे एकमेव संजय शिरसाठ असे एकूण १० आमदार बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. युती सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना जाहीर केली. पण या योजनेला महाविकास आघाडी सरकारने योजना पुन्हा तपासावी लागणार अस जाहीर केलं. त्यामुळे यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार असून मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्न तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचं या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रासारखी एकी मराठवाड्यातील आमदारांनी दाखवायला हवी होती अशी खंत माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.

बाईट हरिभाऊ बागडे आमदार

बाईट प्रश्नात बंब आमदार ..

Last Updated : Feb 3, 2020, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.