ETV Bharat / state

'माझे मंत्रीपद गेले तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही' - औरंगाबाद जिल्हा बातमी

काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. तसा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. यासाठी माझे मंत्रीपद गेले तरी चालेल, असे वक्तव्य इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Dec 5, 2020, 10:06 PM IST

Updated : Dec 5, 2020, 10:17 PM IST

औरंगाबाद - देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा शब्द दिला आहे. तसा कोणी प्रयत्न केला तर आम्ही होऊ देणार नाही माझे मंत्रीपद गेले तरी चालेल मात्र आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

बोलताना विजय वडेट्टीवारी

मराठवाडा ओबीसी कार्यकर्ता परिषदेत गोंधळ

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मेळावा घेतला केले. मात्र, या ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समोरच मंचावर हा गोंधळ झाला. बालाजी शिंदे यांनी भाषण करताना छगन भुजबळ यांनी पाप केले, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगत सवरासावर केली.

सरकारचे काम शिक्षितांना आवडले

राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल. आमच्या सरकारने वर्षभरात केलेल काम शिक्षितांना आवडले आहे. विदर्भात 58 वर्षांचा गड उद्धवस्त केला. वर्षानुवर्षे एकाच विचारसरणीचा माणूस निवडून येत होता. मात्र, यावेळी ओबीसी जागरुक झाला. शिक्षक, डॉक्टर, पदवीधर हे सरकारवर खुश होते. आम्ही केलेले काम त्यांनी पाहिले ते त्यांना आवडले म्हणून य निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळाले, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा 'समृद्धी महामार्ग' पाहणी दौरा, कार्यकर्त्यांना परवानगी माध्यमांना मात्र 'नो एंट्री'

Last Updated : Dec 5, 2020, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.