औरंगाबाद - रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांची लाडू तूलाची ( Minister Sandipan Bhumre Ladutula ) चर्चा चांगलीच रंगली आहे. बिडकीनमध्ये कामगारांचा प्रश्न मार्गी लावल्याने भुमरे यांची लाडूतूला करण्यात आली. मात्र त्यानंतर लाडूचे बॉक्स पळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. यात लहान मुलांपासून ते मोठी माणसांपर्यंत सर्वच जण लाडूसाठी धावपळ करत असल्याचे पाहायला मिळाली.
राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी बिडकीन गावात एका खासगी कंपनीतील ४८ कामगारांचा प्रश्न मार्गी लावला. त्या निमित्ताने बिडकीनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊस परिसरात भुमरे यांच्या लाडू तुलाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. एका काट्यात भुमरे तर दुसऱ्या काट्यात लाडू ठेवण्यात आले. मात्र लाडू तुळा होताच लाडूची पाकीट घेण्यासाठी एकच गर्दी उसळली. कार्यकर्ते आणि कार्यक्रमाला आलेले लोकं लाडूच्या बॉक्सवर तुटून पडले. लाडूंची पळवा पळव सुरू झाली. ज्याला जस जमेल तसे बॉक्स घेऊन पळू लागले. काहींनी आपल्या दोन-दोन हातानी बॉक्स उचलले. यात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांचा समावेश होता. त्यामुळे संदीपान भुमरे यांची लाडू तुलाची चांगलीच चर्चा रंगली.
हेही वाचा - आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली डेलकर कुटुंबीयांची भेट; मोहन डेलकरांना वाहिली आदरांजली